‘बीएसएनएल’ सेवा नॉट रिचेबल

‘बीएसएनएल’ सेवा नॉट रिचेबल

ठाणगाव । वार्ताहर Thangaon-Surgana

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बार्‍हे येथे ‘बीएसएनएल’ (BSNL Tower) टॉवर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून उभा केला आहे. मात्र बार्‍हे येथील बीएसएनएल टॉवर कधी चालू तर कधी बंद, कधी - कधी तर महिनाभर नॉट रिचेबल (Not recoverable) असतो. त्यामुळे भारत संचार निगमचा (Communication Corporation of India) मनोरा हा एक शोभेची वस्तू बनली असेच म्हणावे लागेल.

‘बीएसएनएल’ टॉवर बाबत बार्‍हे परिसरातील स्थानिक पुढारी, बीएसएनएल ग्राहक हे कायमच आजी - माजी लोकप्रतिनिधींकडे तक्रार करतात. परंतु सबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. बार्‍हे ही एक मोठी बाजारपेठ असून साठ ते सत्तर महसुली गावे व वीस ते तीस खेड्या - पाड्यांना जोडलेले आहे.

याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad Primary School), माध्यमिक विद्यालय (Secondary school), उच्च माध्यमिक विद्यालय (High school), अनेक बँका, पशुवैद्यकिय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय अशा विविध विभागाचे सर्व कार्यालये आहेत.

येथे नेटवर्क (Network) चालू असले तर तालुक्याला न - जाता सर्व प्रकारचे आनलाईन कामे (Online works) बार्‍हे येथेच होतात.परंतु बीएसएनएल सेवा खंडित झाली की,येथील सर्व सेवा ठप्प होतात. या विस्कळीत झालेल्या सेवेकडे अधिकारी - कर्मचार्‍यांचे या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळे बाऱ्हे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ऑनलाईन कामे, सुकन्या योजना, विमा पालिसी, नवीन खाते उखडणे अशा विविध प्रकारची कामे करण्यासाठी पोस्ट विभागाची सेवा ही बीएसएनएल वरून जोडली आहे. मात्र येथील बीएसएनएल सेवा व्यवस्थित चालू नसल्यामुळे आम्हाला काम करण्यास खूप तांत्रिक अडचण येत आहेत.त्यामुळे सेवा सुरळीत झाली तर बरे होईल.

- पोस्टमन, बार्‍हे

मी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करतोय परंतू सुरळीत सेवा नसल्यामुळे माझा रिचार्ज वाया जातो. गेल्या कित्येक दिवसापासून येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे.याठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे येथील नागरिकांना करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी दुसर्‍या केंद्रावर जावे लागते. आज बार्‍हे सोडले तर सगळीकडे जीओची सेवा संपूर्ण खेड्या - पाड्यात सुरळीत चालू आहे. त्यामुळे खंडित झालेली सेवा लवसुरळीत चालू करावी.

- संजय पाडवी, ग्राहक

गेल्या दिड वर्षापासून आपण करोना संकटाला सामोरे जात आहोत याचा फटका सगळ्यांनाच बसत आहे. परंतु सर्वात जास्त परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला आहे. बीएसएनएल सेवा सुरळीत चालू नसल्यामुळे आनलाईन शिक्षण तसेच ऑनलाईन काम करायला अडचण होत आहे.

- देवीदास देशमुख, गोपाळपूर

Related Stories

No stories found.