राहुरीत गाईंची निर्घृण हत्या; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

राहुरीत गाईंची निर्घृण हत्या; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Devali Camp

भगूर (Bhagur) जवळील राहुरी शिवारात (Rahuri Area) काल रात्री अज्ञात व्यक्तींनी तीन गाई (cow) व एका वासराची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. तसेच हत्येनंतर रस्त्यालगतच्या शेतात या गाई व वासराच्या शरीराचे तुकडे टाकून देण्यात आले..

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी दोन तास भगूर-पांढुर्ली रस्ता (Bhagur-Pandhurli Road) रोखून धरला होता. त्यानंतर पोलीस विभागाने याची तातडीने दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी पोलिसांसह (Police) घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी जमलेल्या नागरिकांस सदर कृत्य करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. तर या घटनेचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, भाजप मंडल अध्यक्ष प्रसाद आडके,तानाजी भोर, वारकरी संप्रदायाचे ह भ प शिवा आडके,रामा सांगळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने करत निषेध केला.

दरम्यान, यावेळी नागरिकांनी जोरदार निदर्शने करत सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे कृत्य करणाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. तर या जनावरांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून ट्रॅक्टरच्या मदतीने नाशिक (Nashik) येथे पाठविण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com