मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड | प्रतिनिधी

भूमी अभिलेख विभागाच्या (Land Records Department) गलथान कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमवण्याची वेळ आल्यामुळे संबंधित विभागाकडून न्याय मिळाला नाही म्हणून चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी खताळ यांनी गेल्या ४० दिवसापासून येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे...

परंतु, अद्यापही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर या दोघा भाऊ बहिणीने स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) दिवशी येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याअगोदरच या दोघा भाऊ बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न; दोघेही पोलिसांच्या ताब्यात
Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर PM नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, IAF Helicopter द्वारा पुष्पवृष्टी

योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी हे दोघे गेल्या ४० दिवसापासून येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. परंतु, ४० दिवस उपोषणाला बसून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

त्यामुळे संतप्त झालेल्या दोघा भाऊ-बहिणीने आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महसूल आयुक्त कार्यालयात (Revenue Commissioner's office) मंत्री गिरीश महाजन हे झेंडावंदन करण्यात येणार असल्याने त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेतले. सरकारी कामाच्या गलतान कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न; दोघेही पोलिसांच्या ताब्यात
“पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…”; लाल किल्ल्यावरून PM मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com