राज्यस्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत नाशिकला 'कांस्य पदक'

राज्यस्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत नाशिकला 'कांस्य पदक'
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र (maharashtra) आट्या पाट्या महामंडळ (Atya Patya Corporation) व आट्या पाट्या असोसिएशन ऑफ बुलढाणा डिस्ट्रिक्ट (Atya Patya Association of Buldhana District) याच्या सयुक्त विद्यामाने

शेगांव (Shegaon), जिल्हा बुलढाणा (Buldhana) येथे २९ वी मुले व २२ वी मुली सब ज्युनियर राज्यस्तरीय आट्या पाट्या अजिंक्यपद (Sub Junior State Level Atya Patya Championship) पार पडल्या. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील (nashik district) मुले व मुली या दोन्ही संघाने सहभाग घेतला होता.

मुलींच्या संघाने उपांत्य पूर्व फेरीत सोलापूर (solapur) संघाशी चुरशीची लढत दिली परंतु त्यांना यश आले नाही. मुलांच्या संघाने अमरावती (amravati) संघाला (12-9) ने हरवून तृतीय क्रमांक पटकावला. संघ प्रशिक्षक म्हणून गणेश ढेमसे व योगेश शेरमाळे तर संघ मार्गदर्शक म्हणून सुरज गायधनी यांनी काम बघितले. या स्पर्धेमध्ये सहभागी नाशिक जिल्हासंघतील खेळाडू कुमार शुभम तागड, कुमारी स्नेहा कासार, कुमारी समृद्धी खाडे यांचे निवड राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धा चंदिगड (National Atya Patya Championship Chandigarh) येथे दि. 16 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

संघाला जिल्हा सचिव संजय पाटील, प्रद्युम्न जोशी, स्वप्नील कर्पे, सुरेखा पाटील, आनंद खताळ, सुचेता रामराजे, सुनील दवांगे, पवन खोडे, गौरव ढेमसे, विनोद वाणी, रोहन अडांगले, अमित इंगळे, अभिजित देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

मुले कांस्य पदक विजयी संघ

 • अथर्व खालकर :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल

 • अंशुल पोरजे :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल

 • नचिकेत टीळे:- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल

 • अथर्व जाधव:- लेट जयकुमार टिब्रेवाला स्कूल

 • शुभम तागड :- देवळाली हायस्कूल

 • दर्शन डेमसे :- देवळाली हायस्कूल

 • वेद नासिककर :- लेट जयकुमार टिबरेवाला स्कूल

 • आयुष गायटे :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल

 • सूहान लामछाने :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल

 • प्रज्वल लोंढे :- पुरुषोत्तम इंग्लिश मिडीयम स्कूल

 • सहिल जाधव :- के के वाघ स्कूल

 • नयन शेलार:- के के वाघ स्कूल

 • टीम कोच :- गणेश ढेमसे

 • टीम मॅनेजर :- सुरज गायधनी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com