
कोहोर | वार्ताहर | Kohar
पेठ तालुक्यातील (Peth Taluka) कोटंबी व सावळघाटात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. प्रवास करणाऱ्यांचीही दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच सावळ आणि कोटंबी घाटातील (Sawal and Kotambi Ghat) कमी रुंदीकरणामुळे मुख्य वळणावर बाजू देणे अशक्य होत असल्याने वाहनांची लांबच-लांब रांग लागलेली असते. त्यामुळे या दोन्ही घाटात अपघातांची (Accidents) संख्या मोठ्या प्रमाणावर असून अनेक वाहनधारक स्व:तच्या जीवास मुकले आहेत...
या असंख्य कारणांमुळे पेठ तालुक्यातील (दि.०२ ऑक्टोबर) रोजी करंजाळी (Karanjali) येथील चौफुलीवर आदिवासी विकास कृती समितीकडून उपोषण (Hunger Strike) करण्यात आले होते. या समितीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ अतंर्गत पेठ तालुक्यातील मार्गावरील सावळघाटातील कमी रुंदीकरण, अपघात होणारी सदोष तीव्र अरुंद वळणे, एकेरी वाहतुकीसाठी व्यवस्था, तसेच तालुक्यात पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी सावळघाट पायथ्याशी इंग्रजकालीन सावळ्या-पोवळ्या जुन्या घाटातील रस्त्याची मोजणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणी करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या सूचनेवरून आरती हॉटेल ते करंजाळी जवळील नर्सरीपर्यंत पाहणी व मोजणी करण्यात आली. यात दुहेरी रस्ता करण्याचे नियोजन असल्याने तालुक्यातील आदिवासी विकास कृती समितीचे संयोजक यशवंत गांवढे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सोनवणे, धुम, नाईक, नागरे ,वाघ, तिळभाटचे सरपंच मनोज भोये, कैलास भोये, जगन ठाकरे, शांताराम वाघेरे, मनोहर राऊत, गुलाब भोये, निलेश वाघेरे, देवराम वाघेरे, राजाराम राऊत, कैलास भोये, यादव भोये यांच्यासह आदी उपस्थित होते.