
नाशिक । प्रतिनिधी Nashik
निमाच्या ( NIMA) वाटचालीचा सुवर्णकाळ देदीप्यमान होता. मागील अडीच वर्षांच्या वाईट स्वप्नानंतर पुन्हा एकदा नव्या तेजाने सर्वांनी एकत्रितपणे निमाला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन निमाचे माजी अध्यक्ष आर. वेंकटाचलम यांनी केले.
धर्मदाय आयुक्त यांच्या वतीने 40 उद्योजकांच्या मुलाखतीनंतर निवडण्यात आलेल्या 21 जणांच्या कार्यकारिणीने नूतन अध्यक्ष व पदाधिकार्यांची निवड केली. त्यांच्या माध्यमातून निमाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 16 माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. काही माजी अध्यक्ष उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर धर्मादाय आयुक्त आणि नियुक्ती केलेल्या विश्वस्तांपैकी निवडण्यात आलेल्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष के. एल. राठी, आशिष नहार, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, हर्षद ब्राह्मणकर, विरल ठक्कर तसेच मिलिंद राजपूत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमातील विविध आव्हानांचे विवेचन केले व परस्परांमधील मतभेद विसरून एकदिलाने निमाच्या कामासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन मिलिंद राजपूत यांनी केले तर आभार राजेंद्र अहिरे यांनी मानले.
यावेळी माजी अध्यक्ष आर.वेंकटाचलम, जयंत हुन्नर्गीकर, अण्णासाहेब देशमुख, हरिशंकर बॅनर्जी, जे. एम. पवार, डी. जी. जोशी, विवेक गोगटे, मधुकर ब्राह्मणकर, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, रवी वर्मा, संजीव नारंग, रमेश वैश्य, अशोक राजवाडे, शशिकांत जाधव, संतोष मंडलेचा, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, श्रीधर व्यवहारे, संजय सोनवणे, मनीष रावळ, राजेंद्र वडनेरे, उदय खरोटे, जयप्रकाश जोशी, नितीन वागस्कर, संदीप भदाणे, वरुण तलवार, विवेक पाटील, संजय महाजन, व्हिनस वाणी, राजेंद्र वडनेरे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.