33 वर्षांच्या आठवणींना उजाळा

33 वर्षांच्या आठवणींना उजाळा

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

तालुक्यातील पिंपळे येथील गोपाल विद्यालयात (Gopal Vidyalaya) 1988 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा (get-together) उत्साहात पार पडला. तब्बल 33 वर्षांनी एकत्र येत या विद्यार्थ्यांनी जून्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा आनंद (joy of friendship) लुटला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. टी. के. सदगीर होते.

दहावीच्या मुलींच्या गीत मंचाने सर्वांचे स्वागत स्वागत केले. कोरोना (corona) काळात काही माजी विद्यार्थ्यांचे (students) निधन झालेल्या व आजवर निधन झालेल्या 25 माजी विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन सी. एन.पगार यांनी वाचन करीत श्रद्धांजली अर्पण केली. मुख्याध्यापक तुकाराम सदगीर (Headmaster Tukaram Sadgir) यांनी शाळेचा (school) आज पर्यंतचा इतिहास (History) सांगितला.

संस्थेने अनेक समस्यांवर मात करून स्वतःची जागा मिळवत लोकसहभागातून इमारत उभी केल्याचे त्यांनी सांगितले. शाळेत पिण्याच्या पाण्याची टाकी (Drinking water tank), वॉल कंपाऊंड (Wall compound), आधुनिक स्वच्छतागृह (Modern toilet), किचन शेड (Kitchen shed), स्वतंत्र संगणक कक्ष (Independent computer room), क्रीडांगण (Playground) अशा भौतिक सुविधा (Physical convenience) उपलब्ध असल्यामुळे शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याचे त्ंयांनी नमूद केले.

यावेळी एकूण 150 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मच्छिंद्र ढाकणे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप (WhatsApp group) करून सर्वांना एकत्र जोडण्याचे काम केल्याने वेगवेगळ्या राज्यातील मित्रांपर्यंत मेळाव्याची माहिती मिळाली. यावेळी प्रा. बाबा खरात यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. सोमनाथ पानसरे, प्रकाश आव्हाड, शरद बिन्नर, मच्छिंद्र ढाकणे, रामकिसन सांगळे, पोपट पानसरे, यशोदा पानसरे, मीरा पानसरे, ज्ञानेश्वर सांगळे, पांडुरंग बिन्नर, पोपट बिन्नर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन संजय नन्नवरे यांनी केले.

माजी विद्यार्थ्यांकडून भरीव निधी

स्नेहसंमेलन प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत केली. यात यशोदा पानसरे 11 हजार, रामकिसन सांगळे 11 हजार, तारा पानसरे 5 हजार 100, शारदा पानसरे 5 हजार 100, भाऊसाहेब पानसरे 5 हजार 501, सरपंच संपत बिन्नर 5 हजार 100, मच्छिंद्र ढाकणे 5 हजार, सुभाष घुगे 5 हजार, राजेंद्र बिन्नर 2 हजार 100, वनिता बिन्नर 5 हजार 51, जयश्री पानसरे 2 हजार 100, संजय रूपवते 5 हजार 51, विनोद घुगे 5 हजार, पोपट पानसरे 5 हजार असा एकूण 1 लाख 25 हजारांचा भरीव निधी शाळेच्या विकासासाठी जमा केला.

Related Stories

No stories found.