पुल, रस्त्यांचा होणार कायापालट; रस्ते विकासासाठी निधी मंजूर

पुल, रस्त्यांचा होणार कायापालट; रस्ते विकासासाठी निधी मंजूर
USER

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

कळवण (kalwan), सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) रस्त्यांच्या कामांना चालना मिळावी, म्हणून आमदार नितीन पवार (mla nitin pawar) यांच्या प्रयत्नातून कळवण (kalwan), सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 135 कोटी रूपयाचा निधी मंजूर (Funding approved) करण्यात आला आहे. या निधीतून या दोन्ही तालुक्यातील पूल (flyover), रस्ते (road) यांचा कायापालट होऊन रस्ते चकाचक होणार आहे.

या दोन्ही तालुक्यातील पूल, रस्त्यांची कामे (road work) व्हावी आणि खराब झालेली रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी, यासाठी आमदार नितीन पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील (Public Works Department) अधिकार्‍यांच्या बैठका घेवून रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कळवण, सुरगाणा तालुक्यातील रस्ते सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.

कामांना मंजुरी मिळावी आणि त्यांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा, यासाठी आ. नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यामुळे कळवण सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी 135 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते विकासासाठी 34.33 कोटी रुपये आदिवासी विकास विभागाकडून 87 कोटी रुपये नाबार्डकडून पूलांच्या कामासाठी 14 कोटी 62 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले आहे.

या रस्त्यांची कामे होणार

जामले (हा) ते गुंदेश्वर, खडकी निमपाडा ते पुनंदनगर, लखाणी ते सुळे, जिरवाडे ते शिवभांडणे, दळवट ते शिंगाशी, मोहपाडा ते वडाळा, चापापाडा ते मुरुमबारी, चिंचपाडा ते कोटमबारी, काठरे ते निमपाडा, करंभेळ ते सरलेदिगर, मार्केडपिंप्री ते भातोडा, चिंचपाडा ते पळसदर, उंबरदे ते निमपाडा, मेहदर ते बंगाळपाडा, शिरसा ते दांडपाडा, विसापूर ते तिळवणबारी, शेपूपाडा ते बापखेडा, दळवट ते सातओहोळ, एकलहरे ते पाटविहीर, गोसराने ते बार्डे, नवीबेज ते भेंडी, जुनीबेज ते भादवन, भौती ते महाल, चिंचोरे ते देवळीवणी, मोकभंणगी ते देसराणे फाटा, धनेर ते दरेभणगी, दह्याणे ते नाळीद, कातळगाव ते खांडवीपाडा, ढेकाळे ते जामलेपाळया रस्त्यांची कामे होणार

जामले (हा) ते गुंदेश्वर, खडकी निमपाडा ते पुनंदनगर, लखाणी ते सुळे, जिरवाडे ते शिवभांडणे, दळवट ते शिंगाशी, मोहपाडा ते वडाळा, चापापाडा ते मुरुमबारी, चिंचपाडा ते कोटमबारी, काठरे ते निमपाडा, करंभेळ ते सरलेदिगर, मार्केडपिंप्री ते भातोडा, चिंचपाडा ते पळसदर, उंबरदे ते निमपाडा, मेहदर ते बंगाळपाडा, शिरसा ते दांडपाडा, विसापूर ते तिळवणबारी, शेपूपाडा ते बापखेडा, दळवट ते सातओहोळ, एकलहरे ते पाटविहीर, गोसराने ते बार्डे, नवीबेज ते भेंडी, जुनीबेज ते भादवन, भौती ते महाल, चिंचोरे ते देवळीवणी, मोकभंणगी ते देसराणे फाटा, धनेर ते दरेभणगी, दह्याणे ते नाळीद, कातळगाव ते खांडवीपाडा, ढेकाळे ते जामलेपाळ

सुरगाणा तालुक्यातील रस्ते

भवाडा महाले कोटबा रस्ता, पळसन वाघाडी दूधवळ रस्ता, वरंभे ते दुमीपाडा, वडपाडा ते खोबळा दिगर रस्ता, मनखेड दिघीची बारी ते मुरुमबारी, रामा 21 ते बिद्रावनपाडा

या मार्गाची होणार सुधारणा

असोली फाटा ते हिंगवे, कुंडाणे फाटा ते कुंडाणे गावं, कोल्हापूर फाटा ते शिंदे वस्ती, इजिमा 184 ते मोकभणगी, कळवण खुर्द दत्तमंदीर ते दह्याणे, बगडू ते दत्तनगर फाटा, नरुळ ते कन्हेरवाडी गायकवाडनगर रस्ता, ओतूर चौरंगीनाथ मंदीर रस्ता, ओतूर देसाई वस्ती ते चौरंगीनाथ रस्ता, मेहदर दरी रस्ता, मुळाने ते पाटीलपाडा,मोहमुख फाटा ते भगूर्डी, बोरदैवत ते पिंपळपाडा, निवाणे खालची दरी ते वाजगाव रस्ता, करमाळे रस्ता, वरखेडा ते करमाळे, आठबे ते वंजारी, वंजारी ते टेमरुन बारी, अंबापूर ते वेरुळे पाडा, भगूर्डी अंबुडी रस्ता

कळवण व सुरगाणा तालुक्यातील पूल, रस्त्यांची कामे व्हावी आणि खराब झालेली रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी, यासाठी शासनास्तरावर सादर केला होता. कामांना मंजुरी मिळावी आणि त्यांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे कळवण सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी 135 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे.

- आ. नितीन पवार, कळवण - सुरगाणा मतदार संघ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com