नदी, कालव्यांवरील पूल बनले धोकादायक

वळणांवर सूचना फलक नसल्याने अपघाताला निमंत्रण
नदी, कालव्यांवरील पूल बनले धोकादायक

सायखेडा । प्रतिनिधी Saykheda

तालुक्यातील गोदावरी, कादवा, बाणगंगा नदीवर( Godavari, Kadava, Banganga rivers ) असणार्‍या अनेक पुलावरून सातत्याने वहाने सुरू असतात. अनेकवेळा पुलावर वाहनांची गर्दी होते. काही ठिकाणी अरुंद पुलामुळे रहदारीला अडथळे (Narrow bridges obstruct traffic )निर्माण होतात. त्यातच अनेक पुलांना कठडे नसल्यामुळे वाहने नदीपात्रात किंवा कालव्यात पडून दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आता या पुलांना कठडे कधी बसविणार असा प्रश्न वाहन चालकांसह प्रवाशी विचारत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने अनेक पूल हे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले आहे. तालुक्यातील अनेक पुलांना कठडे, साखळी, पोल किंवा संरक्षक फलक लावण्यात आलेले नाही. पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनचालकाला पुलाच्या बाजुचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताला आयतेच निमंत्रण मिळते. गेल्या चार दिवसांपूर्वी नांदूरमध्यमेश्वर येथील पुलावरून वर्‍हाडी पिकअप खाली पडली. कदाचित पुढे पूल आहे असा फलक किंवा संरक्षण कठडे असते तर मोठा अपघात टळला असता. मात्र या दुर्दैवी घटनेत दोन निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला असुन याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला सुरू असलेले रस्त्याचे काम लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. काम जास्त दिवस चालल्याने अडथळा निर्माण होतो. पूल हा नेहमी दुरुस्त असला पाहिजे. कठडे सुस्थितीत असले पाहिजे. तसेच पुलाची नदीकाठ समांतर उंचीही असली पाहिजे. परंतु असे पूल शोधूनही सापडणार नाही. नांदूरमध्यमेश्वर येथेही नदीपात्रावरील पुलाला उंची कमी असल्याने दोन्ही बाजूने रस्त्याचा उतार नदीपात्राच्या दिशेने करण्यात आला आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे.

या पुलासारखी अनेक पुलांची अवस्था झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी कालवा पार करणारे पूल व रस्त्यांना जागीच वळण दिल्यामुळे या ठिकाणची वाहतूकदेखील धोकादायक बनली आहे. तास दिंडोरी जवळील डावा व जलद कालव्यावर दिंडोरीच्या बाजूने जागीच अपघाती वळण असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. या ठिकाणी तास दिंडोरी च्या बाजूने रस्त्याला सरळ पूल बांधले तर हे वळण नाहिसे होवू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का हाच खरा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com