लाचखाेर पाेलिस उपनिरीक्षकासह शिपाई गजाआड

लाचखाेर पाेलिस उपनिरीक्षकासह शिपाई गजाआड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कापड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेवर Cloth Merchant गुन्हा दाखल करुन तिला जामीन मिळाल्यावर पुन्हा कठोर कारवाई करण्याची धमकी देत दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या अंबड पाेलीस ठाण्याच्या पाेलिस उपनिरीक्षकासह पाेलिस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Bribery Prevention Department रंगेहात पकडले.

उपनिरीक्षक कैलास सोनवणे व शिपाई दीपक वाणी असे या दाेघा लाचखोर पाेलिसांची नावे आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबड पोलीस ठाण्याच्या Ambad Police Station उपनिरीक्षक आणि सेवकाला पकडल्याने पाेलिस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिलेचे नवीन नाशिक भागात कापड विक्रीचे दुकान असून तिच्यावर उपनिरीक्षक साेनवणे आणि शिपाई वाणी यांनी कठोर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच ती न्यायालयातून जामिनावर सुटताच या लाचखाेरांनी तिच्याकडे १५ हजाराची लाच मागितली. तडजाेडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला व लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com