घर नावावर करण्यासाठी घेतली ३० हजाराची लाच

परिक्षण भूमापक जाळ्यात
प्रातिनिधिक
प्रातिनिधिक

नाशिक । Nashik

वडीलांच्या नावे खरेदी केलेले घर नावावर करून देण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच घेताना नगर भूमापन अधिकारी कार्यालायातील परिरक्षण भूमापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले.

संदीप हरीलाल चव्हाण, असे एसीबीने पकडलेल्या संशयित अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार्‍या तक्रारदाराच्या वडीलांनी घर खरेदी केले होते. हे घर त्यांच्या वडीलांच्या नावे काम करण्याचे काम प्रलंबीत होते. यासाठी नगर भूमापक कार्यालयातील परिरक्षण भूमापक संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. मात्र चव्हाण यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकान सापळ्याची तयारी भूमापन कार्यालयत सापळा लावला.

यावेळी संशयित चव्हाण याने पंचासमक्ष 50 हजार रूपयांची मागणी केली. तसेच तडजोडीअंती 40 हजार रूपये ठरविण्यात आले. त्यातील 30 हजार रूपये लागलीच देण्याचे ठरले. त्यानुसार ही रक्कम घेऊन तक्रारदार आणि एसीबीचे पथक भूमापन कार्यालयात पोहचले. तिथे लाचेची रक्कम घेताना एसीबी पथकाने संशयित चव्हाणने अटक केली.

दरम्यान, शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी व त्यांच्यावतीने खासगी व्यक्ती लाचेची माागणी करीत असतील तर एसीबीच्या 1064 वा 0253-2575628 किंवा 2578230 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, उपअधिक्षक दिपकर पिंगळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com