सप्तशृंगीगड । Saptsrungigad

नोकरीच आमिष देऊन एकाला दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नांदुरी येथे घडला आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकुळ यज्ञलुकी बिल्लोरे राहणार वडाळा रोड सह्याद्री हॉटेलच्या मागे राधे -अ सोसायटी नाशिक या व्यक्तीने तुमच्या भाचा,व पुतण्याला नोकरीचा आमिष दाखवून नांदुरी येथील सप्तशृंगी विश्रांती हॉटेल मालक भालचंद्र उर्फ भाऊ कानडे यांना दहा लाख रुपयांचा गंडा घातला असून कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की अनेक वर्षांपासून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी १० ते १५ वर्षांपासून गोकुळ बिल्लोरे हा इसम दर्शनाला येत होता. त्याच दरम्यान हॉटेल सप्तशृंगी विश्रांती गृह हॉटेल मालक भालचंद्र कानडे व गोकुळ बिल्लोरे यांची ओळख झाली.

या ओळखीतून गोकुळ याने सरकारी नोकरीला लावून देतो असे सांगून कानडे यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. त्यावेळी कानडे यांना लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.

कानडे यांनी तात्काळ फसवणुकीची रक्कम परत मागितली. त्यावर रक्कम परत करण्याचे आश्वासनही गोकुळ यांनी कानडे यांना दिले. परंतु गोकुळ यांनी असे न करता कानडे यांना धमकी देण्याचे प्रकार सुरु केले.

कानडे यांनी तात्काळ घटनेची माहिती कळवण पोलीस ठाणे येतेच देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड करत आहे