वीज मीटरसाठी खासगी व्यक्तीने मागितली लाच

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात केली अटक
वीज मीटरसाठी खासगी व्यक्तीने मागितली लाच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महावितरणचे Mahavitan वीज मीटर electricity meter मिळवण्याकरिता पैसे भरले असतानादेखील खाजगी व्यक्तीने एकाकडे लाच Bribe मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने Bribery Prevention Department कारवाई करत संबंधिताला अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,एका तक्रारदाराने ऑनलाइन पद्धतीने वीज मीटर मिळण्याकरिता पैसे भरले होते, मात्र संशयित राहुल ज्ञानेश्वर पवार (रा. एन 52,के ए 1/22/ 10 सिंहस्थ नगर नवीन नाशिक ) याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर महावितरण उपकेंद्र शिंदे, तालुका जिल्हा नाशिक येथील कार्यालयात पंचांच्या समोर लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

खाजगी व्यक्ती एखाद्या कामासाठी जर कुणाकडून पैसे मागू शकतो तर यामध्ये काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का ? असा प्रश्न येथे असणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com