ओझे l Oze (विलास ढाकणे)

दिंडोरी तालुक्यात साठ ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल झाले होते परंतु त्यांत अवनखेड व गोंडेगाव या गावानी गावातच एकत्र येवून निवडणुक बिनविरोध केली तर खेडगाव, जोरण, भनवड, जऊळके वणी, शिंदवड या गावानी माघारीच्या दिवशी एकत्र येवून महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या अहवानाला प्रतिसाद देत गावातील गट-तट पक्ष भेद विसरून गावाच्या विकाससाठी निवडणुका बिनविरोध पारपाडल्या आहे.

त्यामुळे दिंडोरी तालुक्यात सात ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होऊ ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुक लागल्या आहे. तालुकयात ३५ वर्षा बिनविरोध निवडणुकीची परपंरा असणा-या कादवा माळूगीची परपंरा खंडीत झाली असून ७ जागा पेकी एक जगा बिनविरोध घेऊन ६ जागासाठी निवडणुक जाहिर झाली आहे.

तर इकडे ओझे येथेही बिनविरोध निवडणुडीला तरुणाईने प्रतिसाद न दिल्यामुळे गावाची ग्रामपंचायत निवडणुकीची परपंरा खंडीत झाली असून खूर्चीसाठी संघर्ष सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या आरक्षित असल्यामुळे त्यांत स्त्री किंवा पुरुष असा बदल होऊ शकतो त्यांमुळे खरा सत्तासंघर्ष हा उपसरपंच पदासाठी होताना दिसत आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच अप्रत्यक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे दिंडोरीच्या पश्चिम भागांमध्ये ख-यां अर्थाने सत्तासंघर्ष हा उपसरपंच पदासाठी दिसून येत आहे.

तालुक्यात पहिल्यादां नामदार नरहरी झिरवाळ यांनी २५ व ५० लाखाच्या निधीची घोषणा करू गावाच्या विकासाची वाट मोकळी करूण दिली होती त्यांत ज्या गावामध्ये विकास कामेच झालेली नाही आशा गावाना विकास करण्याची संधी होती मात्र सत्तासंघर्ष व प्रतिष्ठेसाठी अनेक गावानी हि संधी गामावल्याचे दिसून आले आहे.

तालुक्यातील अनेक आदिवासी भागातील खेडयांमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या आहे आदिवासी वस्तीमध्ये रस्ते नाही आजही काही गावातील जनतेला पावसाळ्या मध्ये चिखलाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निधी हा फक्त मुरूम टाकण्यात खर्च झालेला आहे गावाचे मुरुमाचे साठे संपण्याची वेळ आली मात्र आदिवासी वस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता झालेच नाही.

परंतु आताच्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये तरुणाईने प्रवेश केल्यांमुळे जनतेचे प्रश्न सुटणार का? पुन्हा गावा - गावात ठेकेदार तयार होऊन कामे घेण्यासाठी संघर्ष होणार हे येणारा काळच ठरविणार आहे .

तालुक्यातील अनेक गावामध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून गुप्त बैठकानां मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे सध्या मात्र निवडणुकीच्या बैठका गावात न घेता एकांती मळ्यामध्ये घेतानां दिसत असून आदिवासी गावातील निवडणुक ही फक्त उपसंरपच पदाच्या खुर्चीसाठी प्रतिष्ठेची झाली असून यांच प्रतिष्ठेसाठी गावांनी २५ व ५० लाख निधीला प्रतिसाद दिलेला नाही आशी वस्तुस्थिती सध्यातरी तालुक्यात दिसत आहे.