दरवाजा तोडून सव्वा सोळा लाखांची चोरी

दरवाजा तोडून सव्वा सोळा लाखांची चोरी

जेलरोड परिसरातून चोर आल्याचा संशय

नाशिकरोड | Nashik

नाशिकरोडला (Nashikroad) गुरूवारी सोळा लाखांची घरफोडी (Burglary) झाल्यानंतर पोलिस यंत्रणा हादरली. प्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख पाच लाख रुपये त्याचबरोबर सोन्याचे 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold Theft) चोरले. एकूण सव्वा सोळा लाखांचा एवज चोरीस गेला आहे.

जेलरोड-मोटवानीरोडवरील (Jailroad) मोगल हॉस्पिटलजवळील दिपक अपार्टमेंटमध्ये (Deepak Apartment) ही घरफोडी झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी (Nashik Police) हजेरी लावली. पोलिसांच्या श्वानाने जेलरोडच्या दिशेने माग काढला. त्यावरून चोर जेलरोड परिसरातून आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

करण वासुदेव अमेसर (रा. दिपक अपार्टमेन्ट, सार्थक शूज दुकानजवळ, मोटवानी रोड) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा आशय असा- करण यांच्या चुलत बहिणीचा गुरुवारी इंदिरानगर येथील हॉटेलमध्ये विवाहसोहळा (Marriage) असल्याने अमेसर कुटुंबिय बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घराला कुलूप लाऊन सोहळ्यासाठी गेले होते.

हा सोहळा आटोपून अमेसर कुटुंबिया गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आले. करण यांच्या पत्नीने प्लॅटचा मुख्य दरवाज उघडला. त्या आत गेल्या असता बेडरूममधील कपाटातील साहित्याची उचका-पाचक केल्याचे दिसले.

वरच्या मजल्यावरील बेडरूममध्येही कपाटातील साहित्याची उचका पाचक करण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे चोरी झाल्याचे अमेसर कुटुंबियांच्या लक्षात आले. ते लागलीच किचनमध्ये गेले. त्यांना फ्लॅटचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे लक्षात आले.

घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील रोख पाच लाख रुपये, मंगळसूत्र, चार बांगड्या, सोन्याचा हार, अंगठ्या, नेकलेस, सहा चैन, दोन ब्रेसलेट, कर्णफुले, सात क्वाईन, सोन्याच्या चेनमधील चार पॅन्डल, दोन सोन्याच्या चैन, दोन बांगड्या असा 32 तोळ्याचे 16 लाख 22 हजार 800 रुपयांचे एवज चोरून नेलेला होता. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घरफोडीने पोलिस प्रशासनही हादरून गेले. पोलिस

उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव आदींसह शहरातून आलेल्या अधिका-यांनी तत्काळ घरफोडी झालेल्या प्लॅटची पाहणी केली. ठसे तज्ञ व श्वानपथकही आले. श्वानाने जेलरोडच्या दिशेने माग काढला. दरम्यान, नाशिकरोड परिसरात गुंडगिरी, चो-यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने समाजमन भयग्रस्त झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com