नाशिक l Nashik

द्वारका उड्डाणपूलाकडून पंचवटीतील हिरावाडीत जात असलेल्या महिलेचा मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास घडली.

हिरावाडीतील रहिवाशी असलेल्या भारती जाधव या दुचाकीवरून हिरावाडीकडे निघाल्या होत्या.

यावेळी पतंगीचा मांजा अचानक त्यांच्या मानेला अडकल्याने, तीव्र जखम झाली. ही घटना लक्षात येताच जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, अतिरक्तस्त्राव आणि गळ्याची जखम मोठी असल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वारंवार आवाहन करून आणि पोलीसांनी कारवाई करून देखील जीवघेण्या मांजाचा धोका आजही कायम असल्याचे या घटनेतून दिसून आले.

पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी मांजा निर्मिती, वाहतूक, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच पतंगीसाठी धोकादायक मांजा वापरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते आहे.