श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात आजपासून ब्रम्होत्सव

श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात आजपासून ब्रम्होत्सव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्री व्यंकटेश बालाजी मंदिर Shri Venkatesh Balaji Mandir , कापड पेठ येथे परंपरेनुसार ब्रम्होत्सव Bramhotsav साजरा होणारा आहे.ब्रम्होत्सव निमित्त 7 ते 19 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे.

दरवर्षीप्रमाणे 7 ऑक्टोबरला सकाळी अष्टक भूपाळी, पुण्याहवाचन, घटस्थापना, श्रींची मंदिर परिक्रमा, आरती, शेजारती या विधिवत पद्धतीने उत्सव सुरु होईल. श्री सुदर्शन दिग्विजय रथपरिक्रमा मंदिरात काढण्यात येणार आहे. दसर्‍यापर्यंत दररोज सकाळी श्रींची रथातून मंदिर परिक्रमा होणार असून देव एका वाहनावर आरूढ होतील.

8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा ध्वज पूजन होईल. 11 ऑक्टोबरला कल्याणोत्सव अर्थात ‘श्रीं’चा विवाह समारंभ सायंकाळी 7 वा होईल. 15 ऑक्टोबरला पवमान अभिषेक, 16 ऑक्टोबरला श्रींचे अवभृत स्नान व पवमान अभिषेक, 17 ऑक्टोबरला श्रींचा भोजन प्रसाद, सायंकाळी गोपाळकाला तर 19 ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमेला रासोस्त्सव साजरा होऊन आरती-शेजारतीने ब्रम्होत्सव होईल. कार्यक्रमांचा ऑनलाईन पद्धतीने आस्वाद घेण्याचे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे ट्रस्टी व सेक्रेटरी अ‍ॅड. हर्षवर्धन बालाजीवाले यांनी केले आहे.

संगीत-नृत्य कार्यक्रम मेजवानी

शास्त्रीय संगीत व नृत्याचा वारसा पुढे चालवत यंदाही कार्यक्रमांचे आयोजन. सर्व कार्यक्रम सायंकाळी 7.30 वाजता सादर होतील.

दि.8 ऑक्टोबर : कल्याणी तत्ववादी-दसककर गायन आणि डॉ.हिमांशू विश्वरूप, लखनौ यांचे व्हायोलिन वादन.

9 ऑक्टोबर : रोहित देव, तबला वादन आणि सुश्री. शाश्वती चौहाण यांचे गायन.

10 ऑक्टोबर : भक्ती बोरसे, हार्मोनियम वादन आणि निलू शर्मा यांचे तबलावादन. मंगळवार,

12 ऑक्टोबर : ईश्वरी दसककर आणि डॉक्टर समीर दुबळे यांचे शास्त्रीय गायन.

13 ऑक्टोबर : रेखाताई नाडगौडा व आदिती पानसे यांच्या शिष्या कथ्थक नृत्य प्रस्तुती करतील.

14 ऑक्टोबर : नितीन वारे यांचे शिष्य साथसंगत करतील.

15 ऑक्टोबर : तेजस मिस्त्री आणि सुश्री.रसिका नातू-देसाई गायन सादर करतील.

16 ऑक्टोबर : वैष्णवी भडकमकर यांचे तबलावादन तर पं शंकरराव वैरागकर यांची भजनसंध्या सादर होईल.

17 ऑक्टोबर : नितीन पवार आणि अविराज तायडे यांचे शिष्य तबला वादन व गायन करतील.

18 ऑक्टोबर : कल्याणी पुल्लीवार-जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांचे गायन.

19 ऑक्टोबर : मोहन उपासनी व सहकारी साथ सांगत करतील.

कार्यक्रम ऑनलाईन

उत्सवकाळात पारंपारिक पद्धती, परंतु करोना निर्बंधांमुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम युट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून प्रसारित करण्यात येतील.

Related Stories

No stories found.