
नाशिक | प्रतिनिधी
कापड बाजार येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे (नवरात्रोत्सव) आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोजागरीपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाचा नाशिककरांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.
ब्रह्मोत्सवाचे औचित्य साधत रविवारी सकाळी सात वाजता अष्टक भुपाळी, सकाळी साडेनऊ ते साडेदहा श्रींची मंदिर परिक्रमा, रोज रात्री आठ वाजता शेजारती असे कार्यक्रम होतील. सोमवारी (द्वितीया)सकाळी दहा वाजता ध्वजपूजन, शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी सहा वाजता श्रींचा विवाहसमारंभ (कल्याणोत्सव), मंगळवारी (ता.२४) सकाळी दहा वाजता पवमान अभिषेक, बुधवार (ता.२५)सायंकाळी सात वाजता पवमान अभिषेक, गुरूवार (ता.२६) दुपारी १२ ते २ दरम्यान भंडारा (श्रींचा महाप्रसाद) तर रात्री साडेआठ वाजता गोपालकाला, शनिवारी (ता.28) कोजागिरी पोर्णिमा रासोत्सव, रात्री बारा वाजता शेजारती.असे कार्यक्रम होणार आहेत.
भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
तारीख वेळ कार्यक्रम कलाकार
१६ ऑक्टो. रात्री ८.३० शास्त्रीय गायन गौतम काळे, इंदोर
१७ ऑक्टो. रात्री ८.३० शास्त्रीय नृत्य कथक आदिती पानसे, सुमुखी अथनी, दीपा बक्षी
१८ ऑक्टो. रात्री ८.३० मराठी नाट्यसंगीत वाटचाल डॉ. चारूदत्त आफळे, पुणे
२१ ऑक्टो. रात्री ८.३० संगीत नवदुर्गा सुवर्णा क्षीरसागर व सहकारी.
२२ ऑक्टो. रात्री ८.३० शास्त्रीय गायन भुवनेश कोमकली, देवास
२३ ऑक्टो. सायं.५.०० विष्णू सहस्त्रनाम पठण श्रीपाद गलगले व सहकारी.
२५ ऑक्टो. सायं. ५.०० भजन त्रिदल भजनी मंडळ
२७ ऑक्टो. रात्री ८.३० शास्त्रीय नृत्य- भरतनाट्यम प्राजक्ता भट, सोनाली करंदीकर
२८ ऑक्टो. रात्री ८.३० धरोहर- . एकलवादन- अद्वय पवार
तबलावादन . सहगायन - शिष्य, पवार तबला अकादमी