
सिन्नर । प्रतिनिधी
ब्राम्हण समाजापुढे असलेल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण दूर ठेवून समाजासाठी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केले. सिन्नर येथे लवकरच ब्राम्हण समाजाचा मेळावा घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
नासिक येथील ब्राह्मण महासंघाच्या बैठकीसाठी जातांना सिन्नर येथे थांबून त्यांनी समाज बांधवांशी चर्चा केली.
संघाचे कार्य व पुढील कामाबाबतही त्यांनी माहिती दिली. समाजातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करणे, समाजाला आरक्षण, पुरोहितांना मानधन यासह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.
महासंघाच्या संस्थापक कार्याध्यक्षा स्मिता कुलकर्णी, मनोज तारे, तुषार निंबग्री, राजीव कुलकर्णी यांचे पुरोहित महासंघ व ब्राह्मण महासंघाचे तालुका अध्यक्ष मनोज खेडलेकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष भूषण रत्नाकर, दिलीप बिडवई, विजय पांडे, जयंत व्यवहारे, आदेश कुलकर्णी, सतीश मुळे, हर्षल मुळे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.