ब्रम्हगिरी प्रदक्षिणा
ब्रम्हगिरी प्रदक्षिणा
नाशिक

श्रावणी सोमवार निमित्त होणारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यंदा रद्द

त्र्यंबक प्रशासनाचा निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

'दृष्टी पडता ब्रम्हगिरी त्यासी नाही यमपुरी' 'नामा म्हणे प्रदक्षिणा नाही त्याच्या पुण्या गणना'

श्रावणी सोमवार निमित्त त्रंबकेश्वर येथे होणारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा यंदा रद्द झाली असून यामुळे लाखो शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी श्रावण सोमवारी केली जाणारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा यावर्षी करोना सावट मुळे रद्द करण्याचा निर्णय शासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. करोना संकट काळात राज्याच्या विविध भागातून भाविक आल्यास करोना संसर्ग वाढू शकतो हे टाळण्यासाठी प्रदक्षिणेस मनाई करण्याचे बैठकीत ठरले. तसेच याबाबत प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी सूचना केल्या आहेत.

दरम्यान श्रावण महिना सुरु झाला असून त्र्यंबक येथे दरवर्षी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने हि शेकडो वर्षाची परंपरा खंडित झाली आहे. खबरदरीचा उपाय म्हणून त्र्यंबक प्रशासनाने हि फेरी रद्द केल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. प्रदक्षिणा मार्गात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून फेरी मार्गावरील गावांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्र्यंबक प्रशासन लवकरच याबाबत आदेश काढणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीस डीवायएसपी भीमाशंकर ढोले, तहसीलदार दीपक गिरासे, गट विकास अधिकारी मधुकर मरकुटे उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com