जि.प.स्थायी समिती बैठकीवर सदस्यांचा बहिष्कार

जि.प.स्थायी समिती बैठकीवर सदस्यांचा बहिष्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आरोग्य विभागातील Department of Health प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत ZP standing committee meeting करण्यात आला. यास तब्बल महिना उलटून गेला. तरी देखील महिनाभरात कार्यवाही न केल्याने त्याचे पडसाद झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. बैठकीत ठराव होऊनही अंमलबजावणीस टाळाटाळ करत असलेल्या प्रशासनाचा निषेध म्हणून संतप्त सदस्यांनी स्थायी समिती बैठकीवर बहिष्कार टाकत निषेध नोंदवलाBoycott of members . एकही सदस्य बैठकीला न आल्याने बैठक स्थगित करण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

आरोग्य विभागात असलेल्या कार्यरत औषध निर्माण अधिकार्‍यांचा मुद्दा मागील महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. या विभागातील औषध निर्माण अधिकारी हे तब्बल अकरा वर्षापासून प्रतिनियुक्तीवर मुख्यालयातच काम करत आहेत. याबरोबरच त्यांचेच सहकारी असलेले अधिकारी देखील अनेक वर्षांपासून मुख्यालयात ठाण मांडून असल्याचा मुद्दा भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उचलून धरत निदर्शनास आणून दिला होता.

या दोन्ही अधिकार्‍यांचे हितसंबंध तयार झाल्यामुळे त्यांचे अनेक औषध कंपन्यांशी लागेबांधे तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावेळी सदस्यांनाही त्यांच्या बदलीसाठी आग्रह धरत, संबंधित अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठरावच केला होता. या ठरावाची अमंलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी त्याच वेळी बैठकित दिले होते. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने डॉ. कुंभार्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर देखील प्रशासनाने कार्यवाही केली नाही. ठरावाची अंमलबजावणी केल्याशिवाय स्थायी समिती बैठक होऊ देणार नसल्याचे पवित्रा सदस्यांना जाहीर घेतला होता. असे असतानाही प्रशासनाने ठरावाच्या अंमलबजावणीला केराची टोपली दाखविण्यात आली.

यातच जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या लेखा विभागातील अधिकार्‍यांकडून झालेल्या अपमानावर कार्यवाही न झाल्याने सदस्य संतप्त झाले आहेत.अखेर संतप्त झालेल्या सदस्यांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. एकही सदस्य तसेच पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे सभागृहात जमा झालेल्या प्रशासनानेच बैठक स्थगित करून घेतली.

निनावी तक्रारींवर आरोग्य विभागाच्या एका सेवकाची दहा मिनिटांत मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करतात. दुसरीकडे मात्र, बैठकीत ठराव, तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही. या ठरावाची अंमलबजावणी झालेली नसल्याने स्थायीवर बहिष्कार टाकला आहे. ठरावाची अंमलबजावणी केल्याशिवाय स्थायी होऊ देणार नाही.

- डॉ. आत्माराम कुंभार्डे, सदस्य, स्थायी समिती जि. प.

स्थायी समितीच्या झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे प्रशासनाचे काम आहे. मात्र, झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करून प्रशासन सदस्य व पदाधिकार्‍यांचा अपमान करत आहे. प्रशासन मनमानी पध्दतीने काम करत आहे. आमचे ऐकले जात नसेल तर, बैठक प्रशासन घेतेच कशाला ?

- सविता पवार, सदस्या, स्थायी समिती जि. प.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com