सोशल मिडीयामुळे मुलगा सापडला
सोशल मिडीयामुळे मुलगा सापडला
नाशिक

सोशल मिडीयामुळे मुलगा सापडला

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दिंडोरी । Dindori प्रतिनिधी

शिर्डी येथुन हरवलेला मुलाला सोशल मिडीयामुळे परत त्याच्या आईवडीलाकडे सोपवण्यात आले आहे.

आरुष प्रकाश माडकर (8) हा इयत्ता दुसरीत शिकत असून शिर्डी येथे कालिका नगर परिसरात खेळत असतांना तो हरवला होता. त्यास शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. याबाबत त्यास त्याचे नाव व गाव विचारणा करण्यात आले. परंतु त्यास व्यवस्थित नाव सांगता आले नाही व गाव तळेगांव दिंडोरी असे सांगितले.

त्यामुळे शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुगे यांनी दिंडोरी व वणी पोलीस ठाणे यांच्याकडे फोटो व नाव पाठविले. शोध मोहीम सुरू झाली. त्यानंतर वणी पोलीस ठाण्यामार्फत सर्व पोलीस पाटलांना फोटो आणि मॅसेज पाठविण्यात आल व माहिती घेण्याचे सांगितले.

दिंडोरी तालुक्यात दोन तळेगांव असल्यामुळे दोन्ही गावाच्या पोलीस पाटलांना प्रकाश मोरे व रोशन परदेशी यांनी हा मुलगा आमच्या परिसरातील नाही असे सांगितले.

पण ही पोस्ट गावातील स्थानिक ग्रुपवर आल्यावर तो तळेगांव दिंडोरी येथील नसून त्याच्या मामाचे गावं तळेगांव दिंडोरी समजले. मुलाची आजी ताराबाई बिडकर यांच्याशी फोन वरून संपर्क करून खात्री केली व त्यास परत नातेवाईकाच्या ताब्यात दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com