
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिकच्या वतीने बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले...
मुंबई नाका येथील बॉक्स क्रिकेट टर्फ येथे आयोजित स्पर्धेत देशमुख लायन्स या संघाने अंतिम फेरीत जीएसटी लिजन्टस संघाशी अटीतटीच्या लढतीत विजेतेपद पटकावले कर सल्लागार सुनील देशमुख यांनी संघाच्या वतीने विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारले तर जीएसटी लिजन्टस यांना उपविजेताचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
सामना अतिशय चुरशीचा झाल्याने विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वजण उत्सुकतेने पाहत होते. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू व फलंदाजचा किताब एसजीएसटीचे अमोल लोणकर यांनी पटकावला तर उत्कृष्ट गोलंदाज हे कर सल्लागार हुकुमचंद पाखले ठरले.
उत्कृष्ट झेलचा किताब एसजीएसटीचे चेतन उगले यांना प्रदान करण्यात आला.या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता यात जी एस टी च्या सेंट्रल व स्टेट कार्यालयाने आपल्या संघाचा सहभाग नोंदविला.स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी संदीप सपकाळ, एल के पी फायनान्शियल, पॉलिसी बाजार यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर असोसिएशनचे पदाधिकारी अक्षय सोनजे, प्रकाश विसपुते, निखिल देशमुख तसेच प्रशांत उशीर कमलेश सानप, मुकेश कोठावदे, आदींनी परिश्रम घेतले.
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिकच्या वतीने आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम अतिशय नियोजनपूर्वक व उत्तमरित्या केले होते यानिमित्ताने सर्व कर सल्लागारांना तसेच वस्तू व सेवा कर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना एकत्र येता आले अतिशय उत्साही वातावरणात खेळाडू वृत्तीने सर्व सामने पार पडले अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे तसेच उपक्रमाचे आयोजन केले पाहिजे.
मच्छिंद्र दोंदे, सहाय्यक आयुक्त राज्य वस्तू व सेवा कर विभाग.