नाशिकमध्ये 'इतक्या' नागरिकांनी घेतला बुस्टर डोस

नाशिकमध्ये 'इतक्या' नागरिकांनी घेतला बुस्टर डोस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात आज सकाळपासून बुस्टर डोसला सुरुवात झाली. (Booster dose started in nashik) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna game), महापालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas jadha), जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (ZP CEO Leena bansod), पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin patil SP Nashik) यांनी सुरुवातील बुस्टर डोस घेऊन नागरिकांना प्रोत्साहित केले....

आज दिवसभरात नाशिक शहरात ९२७ नागरिकांनी बुस्टर डोस (Booster Dose) घेतला. नाशिक मनपा प्रशासनाने (NMC Administration) तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली असून शहरातील 138 केंद्रावर हा बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच बूस्टर डोस दिला जाणार आहे.

म्हणजे जर तुम्ही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तुम्हाला बूस्टर डोसही कोविशील्ड लसीचा घ्यावा लागेल. या बूस्टर डोस साठी पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागण्याची गरज नाही. यामध्ये दोन पर्याय असून सुरुवातीला ते कोविन अँप वर जाऊन वेळ घेऊ शकतात.

दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) जात लसीकरण करुन घेऊ शकता. बुस्टर डोससाठी लसीचा दुसरा डोस 9 महिन्यापूर्वी घेतला असणे आवश्यक आहे. तरच तिसर्‍या डोससाठी नोंदणी करु शकता.जर दुसरा डोस घेऊन 9 महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागणार आहे.

आज झालेले एकूण लसीकरण

पहिला डोस ५ हजार ६२३

दुसरा डोस ६ हजार ७६७

बूस्टर डोस ९२७

एकूण १३हजार ३५७

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षासाठी शहरातील ६ ठिकाणी कोव्हँक्सिनसाठी लसीकरण केंद्रावर व्यवस्था केली आहे. प्रत्येकी ऑनलाईन स्लॉट १०० ठेवण्यात आले आहे. आज एकूण २ हजार ७२२ मुलांचे लसीकरण झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com