पिंपळगावला बूस्टर डोस मोहीम

पिंपळगावला बूस्टर डोस मोहीम

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) 18 वर्षापुढील नागरिकांना लसीचा (vaccination) बूस्टर डोस (Booster dose) देण्यास सुरवात झाली आहे.

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) परिसरातील ज्या नागरिकांच्या दुसर्‍या डोसला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशा नागरिकांनी जिल्हा परिषद (zilha parishad) प्राथमिक शाळेसमोरील पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून बूस्टर डोस घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन काळे (Medical Officer Dr. Chetan Kale) यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत कोविड (covid-19) लस (vaccination) देण्याची देशपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. करोना संकट कमी झाले असले तरी नागरिकांनी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. करोनाची चौथी लाट टाळायची असेल तर बूस्टर डोस महत्वाचा ठरणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत कोविड लस अमृत महोत्सव राबवला जात आहे.

पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात (Pimpalgaon Primary Health Centre) बूस्टर लसीचे मोफत डोस 30 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना दुसरा डोस घेवून सहा महिने पूर्ण झाले असतील त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बूस्टर डोस दिला जाईल. करोनाचा प्रादूर्भाव ओसरून तब्बल दोन वर्षे उलटली. करोना (corona) संकट काळात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने करोना लसीचे दोन्ही डोस घेतले. करोना संकट कमी झाल्याने नागरिकांनी बूस्टर डोस (Booster dose) घेण्याकडे पाठ फिरवली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस बूस्टर डोस मोफत मिळणार आहे. त्यानंतर पैसे मोजावे लागणार आहेत. पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सीनचे 850 तर कोविशिल्ड 200 बूस्टर डोस उपलब्ध असून मागणी नुसार पुरवठा वाढविण्यात येईल. बूस्टर डोसमुळे थंडी, ताप सारखा कुठलाही त्रास जाणवत नसल्याने नागरिकांनी बूस्टर लसीकरण करून घ्यावे.

पिंपळगाव बसवंत लसीकरण केंद्रावर 30 सप्टेंबरपर्यंत कोव्हिशिल्ड (Covishield), कोव्हॅक्सीनचे (Covaxin) बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. दुसर्‍या डोसला सहा महिने पूर्ण झालेल्या नागरिकांनी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बूस्टर डोस घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन काळे, डॉ.मंजुश्री पांडे, आरोग्य सहाय्यक शरद तिडके यांचेसह पिंपळगाव ग्रामपालिकेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

अमृत महोत्सव वर्षानिमित्त मोहीम पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्रात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सीनचे बूस्टर डोस उपलब्ध झाले आहे. हे दोन्ही डोस नागरिकांना विनामूल्य देण्यात येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत कोविड लस देण्याची देशपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरी पिंपळगाव बसवंत व परिसरातील नागरीकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित रहावे.

- डॉ.चेतन काळे, वैद्यकीय अधिकारी (पिंपळगाव बसवंत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com