खुशखबर! स्टार एअरच्या नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा होणार सुरू

भुजबळांच्या प्रयत्नांना यश
खुशखबर! स्टार एअरच्या नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा होणार सुरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्टार एअरने (star air) नाशिक-बेळगाव विमानसेवेचे (Nashik-Belgaum Airline Services) बुकिंग पुन्हा सुरू केले असून दि.३ फेब्रुवारी २०२३ पासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे...

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उड्डाण योजनेअंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (jyotiraditya scindia) यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल (Manish Rawal) यांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांनी नुकतीच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उड्डाण योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

या मागणीला यश आले असून दि. ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी त्यांनी बुकिंग देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत.

खुशखबर! स्टार एअरच्या नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा होणार सुरू
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या केवळ अफवा

त्यानुसार एस ५, १४५ ही फ्लाइट बेळगावहून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता निघेल नाशिक येथे १०.३० पोहचेल तर रविवारी सायंकाळी ५.०५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ६.०५ वाजता नाशिकला पोहोचेल.

खुशखबर! स्टार एअरच्या नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा होणार सुरू
तारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

तर एस ५, १४६ ही फ्लाइट नाशिकहून शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता निघेल ११.४५ ला बेळगाव येथे पोहचेल. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल आणि सायंकाळी ७.३० वाजता बेळगावला पोहचेल. या मार्गावर ५० सीटर एम्ब्रेअर १४५ विमाने धावणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com