डोंगरउतारावर पडल्या मोठमोठ्या भेगा; पेठ तालुक्यातील 'एक' गाव केले रिकामे

डोंगरउतारावर पडल्या मोठमोठ्या भेगा; पेठ तालुक्यातील 'एक' गाव केले रिकामे

पेठ | प्रतिनिधी Peth

तालुक्यातील घोटविहीरा गावानजिक (Ghotvihira Tal Peth) असलेल्या बोंडारमाळ (Bondarmal) या पाड्यावर जमिनीला मोठ मोठे तडे पडले आहेत. संततधार पाऊस सुरु असतानाच जमीन आणि डोंगरावर पडलेल्या भेगांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गावातील सर्व ग्रामस्थांना शेजारील गावांत स्थलांतरीत करण्यात आले आहे....

बोंडारमाळ (Bondarmal) हा १० ते १५ घरांच्या वस्तीचा पाडा आहे. ६० ते ७० आदिवासी नागरिक (Tribal Villagers) इथे वास्तव्यास असतात. येथील डोंगर उतारावरील अनेक झाडे उन्मळून पडलेली असून अनेक झाडे वाकलेल्या अवस्थेत आहेत.

सर्व ग्रामस्थांना सुरक्षीतेच्या दृष्टीने नजिकच्या गावांत स्थलांतरीत करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यातील पुणे जिल्ह्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka Malin Village) माळीन हे गाव संततधार पावसात गाडले गेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना राज्यात घडली होती. या घटनेची कुणी आठवण करून दिली तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

तेव्हापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डोंगर उतारावर असलेल्या लहानमोठ्या वाड्या वस्त्या यांची विशेष काळजी पावसाळ्यात घेतली जाते आहे. असाच एक प्रत्यय पेठ तालुक्यात घडला असून डोंगर उतारावर पडलेल्या मोठमोठ्या भेगांबाबत माहिती प्रशासकीय स्तरावर पोहोचली असता तत्काळ पेठचे तहसिलदार संदीप भोसले हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

घर सोडताना आधीच अश्रूंचा बांध फुटलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तहसीलदार भोसले यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com