शेतकऱ्यांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद

बँक ऑफ महाराष्ट्रच्या भऊर शाखेत उघडकीस आला होता प्रकार
शेतकऱ्यांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद

भऊर | वार्ताहर Bhaur

देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास देवळा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे....

काल (दि १३) दिवसभरात बँकेच्या शाखेत अनेक खातेदार व ठेवीदारांनी आपली खाते तपासणीसाठी रीघ लावली होती. त्यामुळे खातेदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले होते. देवळा पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी भऊर गावात ठिय्या दिला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत सदर बँके कडून अद्याप किती रकमेचा अपहार झाला हे कळू शकले नाही . मात्र, कालपर्यंत 32 खातेदारांची 1 कोटी 50 लाख 73 हजार450 रुपयाच्या रकमेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत देवळा पोलिसांत मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी फिर्याद दिल्याने व खातेदाराची बँके कडे रीघ लागल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी चा शोध घ्यावा अशी सूचना केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी संशयित भगवान ज्ञानदेव आहेर यास आज गुरुवारी (१४) रोजी दुपारी त्याचा शोध घेऊन सापळा रचून सोग्रस फाटा (ता चांदवड) येथून त्याला अटक केली.

याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व त्यांचे सहकारी निलेश सावकार ,पुरुषोत्तम शिरसाठ ,ज्योती गोसावी आदींची उपस्थिती होती.

संशयित हा बँकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करत होता. नियमित येणाऱ्या बँक ठेवीदारांच्या, खाते धारकांचा विश्वास संपादन करून खातेधारकांकडुन पिक कर्जाची रक्कम त्याने खात्यावर भरण्यासाठी स्वीकारली.

परंतु, ती रक्कम त्याने खात्यावर न भरता खिशात घातली. तसेच बचत खात्याची रक्कम स्विकारून बँक ऑफ महाराष्ट्र नावाचा सही शिक्का असलेल्या हस्तलिखित पावत्या, पेनाने लिहीलेल्या मुदत ठेवी पावत्या तयार करून त्या बँक ठेवीदारांना दिल्या.

असे एकूण १ कोटी ५० लाख ७३ हजार ४५० रुपयांची फसवणुक करून अपहार त्याने केल्याचे समोर आहे. तसेच मुदत ठेव पावती पुस्तकातील २७ पावत्या चोरी केल्या म्हणुन गुन्हा दाखल आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com