नाशकात बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची कामगिरी
नाशिक सिव्हील
नाशिक सिव्हील

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस (Police) खात्यातील आंतरजिल्हा बदलीसाठी कागदपत्रांची (Documents) अपूर्तता असतांना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यात खाडाखोड करून प्रस्ताव आंतरजिल्हा कमिटीसमोर ठेवून दिशाभूल केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला... 

पोलीस खात्यातील आंतरजिल्हा बदलीसाठी घरातील व्यक्तींच्या आजाराचे कारण दाखवून  सोळा जणांनी १८ मे २०२२ पूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical certificate) सादर केले. 

यात किशोर मधुकर दाते (जळगाव), दिपाली मछिंद्र सानप (पालघर), पुजा बाळासाहेब गायधनी (जळगाव), सुजाता संजय गायकर (जळगाव), योगेश अरुण शिंदे (बृहन्मुंबई), निकिता नितीन ठोंबरे (बृहन्मुंबई), निलेश खंडू झगडे (बृहन्मुंबई), राजु भाऊसाहेब झाडे (बृहन्मुंबई), मोहन दत्तात्रय उगले (बृहन्मुंबई), बाळू दगडू सदगीर (बृहन्मुंबई), नितीन रामकृष्ण सांगळे (बृहन्मुंबई), अनिकेत विष्णू हळदे (बृहन्मुंबई), दिनेश सुकदेव पाटील (पालघर), राहुल मोतीलाल क्षत्रिय (पालघर),धनश्री काशिनाथ देवरे (जळगाव),सचिन भोलेनाथ विसपुते (बृहन्मुंबई) यांचा समावेश आहे.

सदर कर्मचाऱ्यांच्या अर्जासोबत दाखल वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाह्यरुग्ण तपासणी क्रमांकावरून दवाखान्यात उपचार न करता अर्जदारांना आंतरजिल्हा बदलीसाठी मदत व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कनोज, वैद्यकीय अधिकारी नाशिक जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी धुळे जिल्हा रुग्णालय यांनी परस्पर वैद्यकीय प्रमाणपत्र अदा केले.

त्यांच्या विरोधात सरकारतर्फे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी फिर्याद देऊन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com