तन-मनाने संमेलनाचे काम सुरू

‘देशदूत साहित्यिक कट्ट्या’त मुकुंद कुलकर्णी यांच्याशी संवाद
तन-मनाने संमेलनाचे काम सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नाशिकला (nashik) तिसर्‍यांदा संमेलनाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर दैनिक देशदूत (dainik deshdoot) तर्फे सुरू करण्यात आलेल्या देशदूत (deshdoot) साहित्यिक कट्ट्याफत देशदूत व देशदूत टाइम्सच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी साहित्य (Literature), नाटक (Drama) या क्षेत्राशी अतिशय जवळचा व जिव्हाळ्याचा संबंध असलेले तसेच लोकहितवादी मंडळाचे कार्याध्यक्ष (Chairman of Lokhitwadi Mandal) व साहित्य संमेलनाचे सहकार्यवाहक मुकुंद कुलकर्णी (Sahitya Sammelan co-host Mukund Kulkarni) यांच्याशी संवाद साधला.

साहित्य संमेलन भरवणारी संस्था म्हणजे लोकहितवादी मंडळ याबाबत बोलताना कुलकर्णी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी संपूर्ण समाज हा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. मानसिक व वैचारिक सैरवैर वाढलेल्या समाजाला एक वैचारिक स्थैर्य यावे त्यातून निरोगी व सुदृढ समाज व राष्ट्र निर्माण व्हावे, याकरिता संवेदनशील नागरिक प्रयत्नशील होते.

नाशकात वैचारिक पातळीच्या सर्व मान्यवरांनी एकत्र येत समाजाला मानसिकरित्या निरोगी करायचे असल्यास उपक्रम केले पाहिजेत या दृष्टीने नवीन पिढीला दिशादर्शकाचे काम केले व 1950 सालात लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. लोकहितवादी मंडळाचे कार्य गेल्या 70 वर्षांपासून अखंड सुरू असल्याने महाराष्ट्रातील (maharashtra) दोन ते चार संस्थांपैकी एक संस्था आहे.

या संस्थेत सर्व साहित्य सर्व कला यांचे विभाग केले गेले. साहित्यासाठी वाचन संस्कृती निर्माण करणे त्यात शारदा व्याख्यानमालासारखे उपक्रम बनवणे, कलेमध्ये संगीतकलेसाठी नाशकासह महाराष्ट्रातील तरुण गायकांना तसेच साधकांना लोकहितवादी मंडळाने चालना दिली. नाशकात लोकहितवादी मंडळ व त्यानंतर बालाजी मंडळाने शास्त्रीय व नाट्यसंगीताच्या स्पर्धा बनवल्या. त्याचा उपयोग अनेक कलाकारांना त्यांच्या आयुष्यात झाला. लोकहितवादी मंडळाचे समीकरण हे बहुतांश नाटकाशी जास्त जुळते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य नाट्य स्पर्धेबद्दल बोलताना कुलकर्णी म्हणाले की, पूर्वीच्या काळात 1951 सालात या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील स्पर्धा पुण्यात व्हायच्या. लोकहितवादी मंडळ तेव्हापासून सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. ज्यांनी ज्यांनी नाटक रुजवलें अशी मातब्बर मंडळी यामध्ये सहभागी होती. साहित्य संमेलनाबाबत बोलताना कुलकर्णी यांनी सांगितले की, नाशकातील हे तिसरे साहित्य संमेलन आहे. पहिले 1942 ला झाले. त्यानंतर जे संमेलन मिळाले ते 2005 सालात ते डॉ. वसंत पवार यांनी घेतले.

तेव्हा केशव मेश्राम हे त्याचे अध्यक्ष होते. नाशकात विकास होत असताना सांस्कृतिक वारसा वाढण्याची गरज आहे, तो जर घडला नाही तर तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण नाही झाला तर समाज प्रोत्साहित राहणार नाही. आपल्या संस्कृतीवर कळत-नकळत परकीय संस्कृतीचे आक्रमण होत आहे. त्याने पिढी बरबाद होत आहे. मुलांना दोष देण्यात अर्थ नाही. आई- वडिलांना त्यांच्या जबाबदार्‍या कळायला हव्यात. समाजातील परिस्थिती काय आहे व उद्या काय होणार आहे त्यासाठी आज आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे सगळे विचारमंथन या संमेलनातून होते.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनाबाबत बोलतांना कुलकर्णी यांनी सांगितले की, लग्नाच्या गडबडीप्रमाणे सध्या झाले आहे. करोनामुळे वेळ कमी मिळाला हे संमेलन आधी मार्चमध्ये होणार होते, शेवटी डिसेंबरमध्ये करायचे ठरले. व तीन, चार, पाच डिसेंबर ही तारीख ठरली. सध्या तन-मनाने काम सुरू असून धन गोळा करायचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे. करोनामुळे त्यात मोठी अडचण होत आहे.

मात्र या सर्व प्रकारात संमेलनाचे स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उत्साही वातावरण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केले. आम्ही सर्वजण विसरलो व घाबरलो होतो की संमेलन तर करायचे पण ते कसं होईल? भुजबळ यांनी आश्वस्त केले की, आपण सर्वजण मिळून करू व ते चांगले करू. त्यामुळे वेगवेगळ्या 40 समित्या आता कामाला लागल्या आहेत. त्यांचे सर्व समन्वय विश्वास ठाकूर बघतात. प्रत्येकाची जबाबदारी व अधिकार वाटून दिल्याने काम चांगल्या प्रकारे होत आहे असेही त्यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com