वादातूनच जाळल्या गांधी तलावातील बोटी

चौघे जेरबंद, पंचवटी पोलीसांची कामगिरी
वादातूनच जाळल्या गांधी तलावातील बोटी

नाशिक । Nashik

पंचवटीतील (Panchavti) गोदावरी नदितील रामकुंडावर (Godawari Ramkund) गांधी तलावातील (Gandhi Talaw) 4 बोटी जाळपोळ (Boat arson) झाल्याचा प्रकार तीन महिन्यांपुर्वी 24 मार्च 2021 रोजी घडला होता. या प्रकरणी तांत्रिक तपास करत तसेच कौशल्याद्वारे पंचवटी पोलीसांनी (Panchavti Police) 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सरबताची गाडी लावण्यावरून झालेले वाद तसेच बोटी चालकाने दमदाटी केल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे यातून समोर आले आहे.

विकास मंगेश व्यवहारे उर्फ पिठल्या, (27, रा-बालाजी नगर, भांडेबाजार,गंगाघाट, पंचवटी), अजय बाळु जाधव उर्फ भैयटया, (24, रा. पिंगळेमळा, दरीमातोरी) व अक्षय हिरामण जाधव (24, गंगाघाट, पंचवटी,) व आकाश प्रभाकर मोहीत यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला त्यांचा त्यांनी संगनमताने हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत व पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शोध पथकाचे (Crime Investigation Squad) सहायक निरिक्षक सत्यवान पवार व पथकाने संवेदनशील गुन्हयातील संशयितांचा कोणताही ठावठिकाणा नसतांना मागील 3 महिन्यापासुन कौशल्यपुर्ण पध्दतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून तपास लावला पथकाचे पोलिसी शिपाई राकेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून या गुन्हाचा तपास पथकाने केला. अखेर हा गुन्हा उघडकिस आणला.

संशयित विकास व्यवहारे उर्फ पिठल्या, याचा फिर्यादी सोबत गंगाघाट येथे लिंबु सरबतची हातगाडी लावण्याचे कारणावरून वाद झाला होता. तसेच अजय बाळु जाधव उर्फ भैयटया हा पोलीसांचा खबरी असुन गंगाघाटावरील सर्व माहिती पोलीसांना देतो असा गैरसमज करून फिर्यादीने गुन्हा घडण्यापुर्वि दमदाटी करून पाहुन घेण्याची धमकी दिली होती. त्याचा राग मनात धरून संशयित संगनमताने बोटींग क्लब मधिल 4 बोटींवर पेट्रोल ओतुन त्यास आग लावुन दिड लाखाचे नुकसान केल्याचें उघडकीस आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com