Blood donation
Blood donation|पिंपळगावला 505 नागरिकांचे रक्तदान
नाशिक

पिंपळगावला 505 नागरिकांचे रक्तदान

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

पालखेड मिरचिचे। Palkhed Mirchiche वार्ताहर

पिंपळगाव बसवंत येथे तालुक्याचे आमदार दिलीप बनकर त्यांचे वडील व दोन मोठे भाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गत अनेक वर्षापासून सुरू असलेला रक्तदान महायज्ञ सोहळ्याच्या आवाहनाला तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात 505 नागरिकांनी रक्तदान केल्याने 505 रक्त बाटल्यांचे संकलन झाले. आजपर्यंत 13049 इतक्या रक्त बाटल्यांचे संकलन नाशिक येथील अर्पण रक्तपेढीला बनकर यांच्या माध्यमातून झालेले आहे.

आ. दिलीप बनकर यांच्या रक्तदानाचा फायदा हा सर्वसामान्य जनतेसमोर तालुक्यातील रक्ताची गरज असणार्‍या रुग्णांना नाशिक येथील अर्पण रक्तपेढीमध्ये जाऊन होतो. जेव्हाही निफाड तालुक्यातील रुग्णांना गरज लागते तेव्हा हक्काने अर्पण रक्तपेढीमध्ये बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित रुग्णाला रक्तपुरवठा विनामूल्य होत असल्याने आ. बनकर यांनी घेतलेला हा सामाजिक वसा गत अनेक वर्षांपासून सुरू असल्याने या कार्यातून सर्वसामान्यांना रुग्णालयात तत्काळ रक्ताचा पुरवठा होत असतो.

या रक्तदानाचे तालुक्यातच नाही तर राज्यभरातून अभिनंदन होत असते. या रक्तदान प्रसंगी तालुक्यातील घराघरातून, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदान केले.

याप्रसंगी माजी मंत्री विनायकदादा पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे बाळासाहेब वाघ, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, मा. आ. अनिल कदम, मा. आ. नानासाहेब बोरस्ते, निसाका मा. संचालक तानाजी बनकर, मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, प्रणव पवार, सुभाष कराड, विश्वास मोरे, सुरेश खोडे, सचिन पिंगळे, राजेंद्र डोखळे, चंद्रकांत खोडे, नानासाहेब महाले, संजय बनकर, संजय मोरे, निवृत्ती धनवटे, बाळासाहेब बनकर, रामभाऊ माळोदे.

सुरेश कमानकर, गुरुदेव कांदे, दीपक बोरस्ते, दत्तू डुकरे, डी. के. जगताप, प्रांत डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, सायखेड्यांचे राजेंद्र कुटे, संपत विधाते, लक्ष्मण खोडे, बाळा बनकर, गफ्फार शेख, साहेबराव देशमाने, नंदू सांगळे, शिवाजी संधान, नंदू गांगुर्डे, विलास बोरस्ते, अनिल बोरस्ते.

नारायण पोटे, अजय गायकवाड, शंकरलाल ठक्कर, साहेबराव मोरे, सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, सोपान खालकर, चंद्रकांत बनकर, बापू कुंदे, उत्तम कुंदे, सागर कुंदे, दिलीप कापसे, सचिन जाधव, किरण निरभवणे, रमेश घुगे, संजय वाळुंज.

भाऊलाल कुटे, नवाज काझी, बापू कडाळे, अश्विन गागरे, साहेबराव मोरे, जगन्नाथ खोडे, विलास मंडलिक, संदेश सानप, अरुण घोटेकर, जयराम मोरे, दिलीप देशमाने, शंकर बनकर, राजेंद्र खोडे, डॉ. महेश बुब, माधव ढोमसे, गणपत हाडपे, भास्कर सोनवणे, संजय सांगळे, विजय कारे, डॉ. हेमंत दळवी, संतोष आहेर, दीपक मोरे.

रामकृष्ण खोडे, दीपक विधाते, अल्पेश पारख, शाम निरभवणे, गणेश गोराडे, साहेबराव खालकर, हेमंत सानप, बाबूराव सानप, ज्ञानेश्वर पानगव्हाणे, अनिल क्षीरसागर, मोहन खापरे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com