शिवसेना वर्धापनदिन : २ हजार २८१ पिशव्यांचे रक्त संकलन

शिवसेना वर्धापनदिन : २ हजार २८१ पिशव्यांचे रक्त संकलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेतर्फे पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमधून २ हजार २८१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले...

तसेच लहान मुलांना लाडू आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपासह अन्नदान आणि वृक्षारोपण आदी उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचा वर्धापनदिन शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला.

वर्धापन दिनानिमित्त रविवार कारंजा येथे हेमलता टॉकीज, रोटरी क्लब हॉल (गंजमाळ), मनपा शाळा क्र. १२५, दत्तमंदिर रोड (नाशिक रोड), मारुती मंदिर (चेहडी पंपिंग), पॉलिटेक्निक कॉलेजशेजारी (सामनगाव रोड), बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (सिंहस्थनगर), महात्मा फुले सभागृह, शिवाजी चौक (सिडको), गणपती मंदिर जाधव संकुल (चुंचाळे) आदी ८ ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली.

शिवसेनेने या उपक्रमाच्या माध्यमातून २ हजार २८१ पिशव्या रक्त संकलित केल्याचे महानगप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खा. हेमंत गोडसे यांच्यासह अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com