आयएमए तर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन

आयएमए तर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी सहभागाचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1 मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करोना आपत्तीच्या काळात नव्याने उभ्या राहिलेल्या अपुर्‍या रक्तसाठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी आयएमए सरसावली आहे. त्यासाठी आयएमएच्या शालिमार येथील इमारतीतच एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. करोना इन्फेक्शन किंवा लसीकरण झाल्यानंतर किमान 28 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी हे शिबिर सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

इच्छुकांनी शनिवारी 1 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी1 वाजेपर्यंत आयएमए हॉल शालिमार येथे जाऊन रक्तदान करावे असे आवाहन विद्यमान अध्यक्ष डॉ हेमंत सोननीस आणि सचिव डॉ कविता गाडेकर यांनी केले आहे. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ सागर भालेराव, डॉ प्रीती लुंकड, डॉ पूनम वराडे काम बघत आहेत.

तसेच रविवारी (दि.2) आयएमए तर्फे कोवीड -19 वर ‘प्रश्न तुमचे उत्तर आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सुप्रसिद्ध फिजीशियन डॉ. यतींद्र दुबे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क साधणार आहेत. करोना बद्दल मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हांला या कार्यक्रमात सहभागी होऊन मिळतील. नागरिकांच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरें देण्याचा आमचा प्रयत्न राहीन अशी ग्वाही आयएमए चे अध्यक्ष डॉ हेमंत सोननीस आणि सचिव डॉ कविता गाडेकर यांनी दिली.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात डॉ पंकज भट आणि डॉ सारिका देवरे मेहनत घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com