युवासेनेतर्फे आयोजित शिबिरात ७० पिशव्या रक्त संकलित

युवासेनेतर्फे आयोजित शिबिरात ७० पिशव्या रक्त संकलित

नाशिक | Nashik

शिवसेना, युवासेना, श्रीमान योगी फाउंडेशन व मॉडर्न फाऊंडेशनतर्फे द्वारका परिसरातील हॉटेल अविनाश इन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 70 शिवसैनिकांनी रक्तदान करून इतरांपुढे चांगलाच आदर्श घालून दिला आहे, असे प्रतिपादन बबनराव घोलप यांनी केले.

नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो हे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्याचा निर्धार आम्ही केला. त्यादृष्टीने विविध ठिकाणी शिबिरे घेऊन आम्ही मोठ्यप्रमाणात रक्त संकलन करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे बडगुजर यांनी यावेळी सांगितले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा यावेळी घोलप व बडगुजर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

यावेळी शिवसेना नगरसेवक सुनिल गोडसे, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे यांच्यासह ७० जणांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपमहानगर प्रमुख किरण पाटील, विभागय प्रमुख गौरव पगारे यांनी केले. आगामी पंधरा दिवसांत जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती गणेश बर्वे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com