
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रोटरॅक्ट क्लब ऑफ नाशिक स्मार्टसिटीच्या वतीने गंगापूर रोडजवळ असलेल्या जनकल्याण रक्त पेढीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रोट्रॅक्टर इशान दांग्रिकर यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तब्बल ९ तास हे शिबीर चालले. एकूण ३० रक्तगताच्या पिशव्या रक्तदात्यांनी दान केल्या. रोटरॅक्ट क्लब ऑफ नाशिक स्मार्टसिटीने हे उत्तम कार्य करून समाजामध्ये एकत्रेतेची भावना निर्माण केली. यावेळी स्मार्टसिटीची अध्यक्ष राघव पगार हे देखील आवर्जून उपस्थित होते.