राष्ट्रवादी सामाजिक न्यायच्या वतीने रक्तदान शिबीर

राष्ट्रवादी सामाजिक न्यायच्या वतीने रक्तदान शिबीर

नाशिक | Nashik

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थी प्रयत्न सुरू असताना राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या दुहेरी संकटाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सामाजिक न्यायचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विधानसभा अध्यक्ष निलेश जगताप यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरूनही प्रयत्न सुरू आहेत.

तसेच रुग्णालयातही करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच काही करोना रुग्ण गंभीर असून, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज लागतेय. कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रक्ताची गरज वाढली असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सुरक्षित अंतर ठेवत जास्त गर्दी न करता स्वच्छता करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदात्यांची काळजी घेत व संपूर्ण आजाराची विचारपूस करत योग्य चाचणी करून त्यांचे रक्त संकलित करण्यात आले. विविध शस्त्रक्रिया व आजारांच्या उपचाराकरिता रक्ताची आवश्यकता भासते.

करोना विषाणू मुळे रक्तदाते कमी झाले असून नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. मोठमोठे उद्योजक आपल्या कंपनीमध्ये कर्मचारी वर्गात रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात परंतु कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने कर्मचारी वर्गही रक्तदान करत नाही.

करोनाच्या संकटामुळे रक्तदाते रक्तदान करत नसल्याने रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठीच या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com