रक्तदानाच्या कार्यास वाहून घेणाऱ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा

इंदिरानगरला रक्तदान शिबिर उद्घाटनाप्रसंगी खा. गोडसेंचे प्रतिपादन
रक्तदानाच्या कार्यास वाहून घेणाऱ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने रक्तदान करून आपली खरी ओळख निर्माण करणाऱ्या शिवसैनिकांना मी मानाचा मुजरा करतो. जनसेवेचा हा वसा कायम जोपासा, असे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले.

इंदिरानगरच्या रथचक्र चौक परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शिवसेना शाखा क्र. ३० व अवजड वाहतूक सेना अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

आतापर्यंत झालेल्या २८ रक्तदान शिबिरात १४०२ पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी महानगरप्रमुख महेश बिडवे, नगरसेवक सुनील गोडसे, उपमहानगर प्रमुख दत्ता दंडगव्हाळ, माजी शिक्षण मंडळ उपसभापती राजेंद्र देसाई, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, बालम शिरसाठ, विधानसभा संघटक विरद्रसिंग टिळे, विभागप्रमुख नीलेश साळुंखे, जयेश पाटील, जिल्हा कार्यालयप्रमुख राजेंद्र वाकसरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदाते, पत्रकार, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय गायकर यांनी शिबिराचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन श्वेता लासुरे यांनी केले. आभार प्रमोद लासुरे यांनी मानले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंद्रपालसिंग चढ्ढा, विश्वास तांबे, राहुल वाजे यांनी परिश्रम घेतले. डॉ. नितीन जैन, अपर्णा काळे, अर्पित शिरसाठ, माधुरी पर्डे, कृष्णा अडसुळ, अंजू साळुंखे, प्रतीक्षा रोडगे यांचे सहकार्य लाभले. यावेळी रुषी वर्मा, शोभा दोंदे, सुभाष शेजवळ, किरण शिंदे, संदीप गिते, प्रदीप जगताप, ऋषी वर्मा, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com