रक्तदान शिबीर
रक्तदान शिबीर
नाशिक

दिंडोरी : भारतीय बौद्ध महासभा आयोजित रक्तदान शिबीर

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी | Dindori

भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका व समता रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड वसतिगृह दिंडोरी येथे ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाकवी वामन दादा कर्डक यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस, मिलिटरी, आरोग्य कर्मचारी अहोरात्र परीश्रम घेत आहेत, मग आपलीही काहीतरी जबाबदारी बनतेच म्हणून रक्तदान शिबिरासाठी दिंडोरी तालुक्यातील सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत उत्साह दर्शविला.

करोना परिस्थिती मध्ये रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ही गरज भागवू शकतो, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.

यावेळी दिंडोरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गांगुर्डे सरचिटणीस रितेश गांगुर्डे, कोषाध्यक्ष चंद्रकांत पगारे, पर्यटन सचिव प्रदीप गांगुर्डे, संस्कार सचिव जयेश मोरे तसेच समता रक्तपेढीचे डॉ. इरफान खान, कुटुंब फाऊंडेशनच्या सुचित्रा आहिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com