दिंडोरी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर

दिंडोरी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर

दिंडोरी | Dindori

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका भीमगर्जना फ्रेंड सर्कल जऊळके व समता रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जऊळके रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच राज्यात रक्ताचा तुटवडा देखील जाणवत असताना रक्तदान मोलाचे ठरू शकते. ही बाब लक्षात घेत महामानवाला अभिवादन म्हणून युवकांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर राबविण्यात आले. यावेळी एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करीत अनोखी देशसेवा बजावली.

या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा, समस्त ग्रामस्थ जऊळके, कुटुंब फाउंडेशन नाशिक तसेच पारले बिस्कीट प्रा.लि. यांनी रक्तदान दात्यांना बिस्किटांचे वाटप केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com