वाहनानां प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंद करा: कोतवाल

सणवारांमुळे बाजारपेठेत वर्दळीने वाहतुकीस अडसर
वाहनानां प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंद करा: कोतवाल

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

नवरात्र (Navratra) सुरु झाल्याने शहरातील बाजारपेठ गर्दीने ओसंडून वाहत आहे. कोरोनाच्या (corona) दोन वर्षांतील निर्बंध कमी झाल्यांमुळे यंदा नवरात्र, दसरा (Dashehra) व दिवाळी (Diwali) सणा़साठी शहरातील अरुंद रस्त्यांवर (narrow roads) खरेदीसाठी रस्त्यावर झुंबड उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी (traffice jam) कमी करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावर पोलीस कर्मचार्‍यांच्या नेमणुकीसह सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत बॅरीकेट्स (Barricades) लावुन दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी (Access to vehicles is prohibited) करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल (Former City President of Nationalist Congress Party Namdev Kotwal) यांनी केली आहे. शहरातील रोजची वाहतुक कोंडी असह्य होत आहे. कित्येक वेळा वाहतुकीची कोंडी तशीच राहते आहे.

गणेशोत्सवात (ganeshotsav) शहरातील नाशिक वेस, भिकुसा कोपरा, गणेश पेठ, नवापुल, खासदार पुलावर झालेल्या कोंडीने नागरीक अक्षरशः मेटाकुटीला आले होते. सणासुदीचे (festivals) दिवस असतांना किमान भाऊबीजेपर्यंत नागरीकांची रस्त्यावर खरेदीसाठी झुंबड ही कायम रहाणार आहे. तालुक्यातील 128 गावांची प्रमुख बाजारपेठ, तालुक्याचे ठिकाण म्हणून सिन्नर शहर (sinnar) ऊलाढालीचे केंद्र आहे.

नवरात्रीच्या आजच्या पहिल्याच दिवशी शहरात दुचाकी सोडा, शहरातील प्रमुख मार्गावर पायी चालणे ही अवघड झाले होते. शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या कोंडीबाबत गणेशोत्सवाच्या शांतता समितीच्या बैठकीतही दिवाळीपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व अस्ताव्यस्त होणार्‍या पार्किंगकडे होणारे दुर्लक्ष याबाबत लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर गणेशोत्सवाचे शेवटचे पाच दिवस वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला. मात्र, गणेशोत्सवा नंतर सर्व काही आलबेल आहे अशी समजूत झालेली दिसत आहे.

पुढील महत्वाचे सण लक्षात घेता शहरातील सुरळीत वाहतुकीबाबत पोलीस प्रशासन व नगर पालिका प्रशासनाने पाहिजे त्या गांभिर्याने पावले ऊचललेली नाहीत. वाहतुक कोंडी दिवसेंदिवस वाढतच राहणार असून दसरा सण तोंडावर असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत एकेरी करण्यांत यावी अशी मागणी कोतवाल यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com