मनाला गारवा देणारा गुलमोहर बहरला..!

मनाला गारवा देणारा गुलमोहर बहरला..!

दिंडोरी | Dindori

लॉकडाऊनमुळे सारे काही ठप्प आहे. त्याला अपवाद निसर्ग....उन्हाळ्यात घरात बसूनही अंगाची काहीली होत असतांना रखरखत्या उन्हात ऐटीत गुलमोहोर फुलेले दिसून येत आहे.

गुलमोहर वृक्ष रस्त्यावरुन येणार्‍या - जाणार्‍याचे लक्ष वेधून घेत आहे. दिंडोरी तालुक्यात गुलमोहराच्या वृक्षांचे प्रमाण तुलनेने अधिक दिसून येत आहे. त्याच्या भर्द अशा भगव्या रंगाची फुले आतापर्यंत सर्वांनाच भुरळ घालत आलेली आहे.

या गर्द फुलांचा बहर ओसरल्यावर तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा झाडावर लटकू लागतात. काही दिवसांनी त्या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यापासून नवीन गुलमोहराची झाडे अंकुरत असतात. अगदी आग लागल्यासारख्या लाल फुलांनी भर उन्हाळ्यात हे गुलमोहर

फुललेले असल्याचे दिसून येत आहे. सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतामध्ये, शिवारामध्ये, आलेल्या हिरवाईमुळे शेतमजूर, वाटसरू, आणि शेतकरी यांना याचा दिलासा मिळत असून पक्षांचाही किलबिलाट ऐकू येत आहे. त्यामुळे सध्या वातावरण आनंददायी दिसत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com