भाजपने घातला मनपा आयुक्तांना घेराव; 'हे' आहे कारण

भाजपने घातला मनपा आयुक्तांना घेराव; 'हे' आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रारुप मतदार याद्यांमधील (Draft Voter Lists) त्रुटींच्या विषयाचे गांभीर्य ओळखून अधिकारी व कर्मचार्‍यांना कामाला लावावे. यासाठी भाजप (BJP) शिष्ट मंडळाने महापालिका आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांना घेराव घातला. त्यानंतर त्यांनी आपण यात योग्य प्रकारे लक्ष घालू, असे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) सार्वत्रिक निवडणुकीच्या (Election) प्रारूप मतदार याद्या (Draft voter lists) प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांचे अवलोकन केले असता मतदार याद्यांबाबत नागरिक व लोकप्रतिनिंधीच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.

अनेक प्रभागातील नावे इतरत्र प्रभागात व इतर प्रभागातील काही नावे नव्याने रचना केलेल्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. या सदोष याद्यांबाबत हरकती घेण्यासाठी दिलेली मुदत ही अल्प आहे.

प्रारूप याद्यांवर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी (Demand) भाजप शिष्ट मंडळातर्फे करण्यात आली. या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्तांनी योग्य त्या कार्यवाहिची ग्वाही दिली आहे.

यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी (Laxman Savji), शहराध्यक्ष गिरीष पालवे (Girish Palve), संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, जगन पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, उध्दव निमसे, अलका आहिरे, शाम बडोदे, भगवान दोंदे, माधुरी बोलकर, कुणाल वाघ, गोविंद घुगे, सुरेश पाटील, मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, अविनाश पाटील, संतोष नेरे यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com