मालेगावात भाजपची जबाबदारी अव्दय हिरेंकडे

हिरे-गायकवाड गटाचे मनोमिलनाने कार्यकर्ते उत्साहीत
मालेगावात भाजपची जबाबदारी अव्दय हिरेंकडे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

नियोजित मालेगाव (malegaon) जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका (election) युवकनेते डॉ.अव्दय हिरे (Dr. Avday Hiray) यांच्या नेतृत्वाखालीच भाजप (bjp) लढणार आहे. हिरे यांनी पक्ष सोडला नव्हता असे स्पष्ट करत माजीमंत्री आ. गिरीश महाजन (girish mahajan) यांनी हिरे व गटनेते सुनिल गायकवाड यांच्यात असलेले गैरसमज दूर झाले आहेत. ते एकत्रितपणे सबका साथ सबका विकास (sabka sath sabka vikas) करतील. सर्व निवडणुकांची जबाबदारी हिरेंवर सोपविण्यात आल्याची माहिती दिली.

दरम्यान, जळगाव (jalgaon) येथे माजी मंत्री आ. गिरीश महाजन व आ. जयकुमार रावल (mla jayakumar rawal) यांच्या समवेत झालेल्या बैठकीत युवकनेते अव्दय हिरे व भाजप गटनेते सुनिल गायकवाड (sunil gaikwad) यांच्यातील गैरसमज दूर करण्यात येवून मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले गेले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिरे-गायकवाड गटाचे पक्ष हितासाठी मनोमिलन व्हावे या दृष्टीकोनातून ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांनी पुढाकार घेतला होता.

त्यांच्या मध्यस्थीस अखेर यश येवून जळगाव येथे झालेल्या बैठकीत या मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले गेले. या बैठकीत आ. महाजन, आ. रावल यांनी चर्चेअंती आगामी जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti), महानगरपालिका (municipal corporation), बाजार समिती (Market Committee), शेतकी संघ आदी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हिरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातर्फे लढविल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.

हिरे-गायकवाड यांच्यातील गैरसमज दूर झाले असल्याने ते एकत्रितपणे पक्ष संघटन मजबूत करण्यासह निवडणुका जिंकण्यासाठी सक्रिय होतील, असे आ. महाजन यांच्यातर्फे स्पष्ट केले गेले. हिरे यांनी भाजप पक्ष सोडला नव्हता. गायकवाड व त्यांच्यामध्ये गैरसमजातून मतभेद झाल्याने ते सक्रिय नव्हते. मात्र हिरे यांनी पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

गायकवाड यांच्याबरोबर असलेले त्यांचे मतभेद देखील संपुष्टात आले आहे. त्यामुळे हिरेंच्या सक्रियतेमुळे भाजप पुन्हा जिल्ह्यात बळकट होणार असल्याचे आ. रावल यांनी यावेळी बोलतांना सांगितले.आपण भाजपातच होतो फक्त सक्रिय नव्हतो. पक्षाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून आगामी सर्वच निवडणुकांमध्ये पक्षाचा झेंडा फडकविला जाणार असल्याचे सुतोवाच हिरे यांनी यावेळी बोलतांना केले.

गायकवाड यांच्याबरोबर असलेले गैरसमज दूर झाले आहेत. आम्ही दोघे एकत्र एकदिलाने पुन्हा पक्ष बळकट करू, अशी घोषणा हिरे यांनी केली. आपण सदैव पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठीच सक्रिय राहिलो आहोत. युवकनेते हिरे पुन्हा सक्रिय होत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाईल. आमच्यात कोणताही दुरावा राहिलेला नाही.

पक्षाने आगामी सर्व निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करावे या दृष्टीकोनातूनच संपुर्ण ताकदीने काम करणार असल्याचे गटनेते सुनिल गायकवाड यांनी यावेळी बोलतांना सांगितले. दरम्यान, हिरे-गायकवाड गटाचे मनोमिलन घडविण्यात भाजपचे संकटमोचन आ. गिरीश महाजन व आ. जयकुमार रावल यांना यश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून हिरे यांच्या भाजपामध्ये सक्रिय होण्याच्या भुमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com