विकासासाठी भाजपच पर्यायः खा.भामरे

प्रभाग 9 मध्ये विकासकामांचा शुभारंभ
विकासासाठी भाजपच पर्यायः खा.भामरे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मतदारांच्या मागणीनुसार विविध कामे साकारत विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम भाजप नगरसेवक (BJP corporator) करत आहेत. प्रभाग 9 मध्ये साकारण्यात आलेली कोट्यवधींची विकासकामे याची साक्ष देत आहेत.

जनतेच्या मुलभूत सुविधांची (Infrastructure) पुर्तता व्हावी या दृष्टीकोनातून केंद्रातील मोदी सरकारच्या (modi government) माध्यमातून आपण विविध योजना येथे राबवत आहोत. निवडणुका (election) आल्यावरच काहींना विकासकामांची आठवण येते.

त्यामुळे विकासासाठी भाजपशिवाय (bjp) दुसरा पर्याय नसल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. या विकासकामांच्या जोरावरच भाजप आगामी निवडणुका जिंकेल, असा विश्वास खा.डॉ. सुभाष भामरे (MP Dr. Subhash Bhamre) यांनी येथे बोलतांना व्यक्त केला.

शहरातील प्रभाग 9 मधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) नगर, क्रांती नगर, संत रोहिदास चौक, मोची कॉर्नर आदी भागात शिवजयंतीचे (shiv jayanti) औचित्य साधून भाजप गटनेते सुनिल गायकवाड, नगरसेविका तुळसाबाई साबणे, दिनेश साबणे यांच्या पाठपुराव्यातून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सुमारे 3 कोटी निधीतून भुयारी गटार, रस्ते, सभागृह निर्मिती आदी विविध विकासकामांचा शुभारंभ खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना खा.डॉ. भामरे बोलत होते. गटनेते सुनिल गायकवाड, प्रांतिक सदस्य दादा जाधव, व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन पोफळे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, महानगरप्रमुख मदन गायकवाड, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, भरत पोफळे, लकी गिल, नगरसेविका सुवर्णा शेलार, विजय देवरे, संजय काळे, दीपक गायकवाड, दिनेश साबणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भुमीगत गटार (Underground sewers), आरएमसी दर्जाचे रस्ते (RMC quality roads), पथदीप (Streetlight), उद्यान आदी विविध विकासकामांमुळे प्रभाग 9 विकासाचे रोल मॉडेल ठरले आहे. निवडणुकीत विकासपुर्तीचा दिलेला शब्द सुनिल गायकवाड, दिनेश साबणेसह सर्व भाजप नगरसेवकांनी पाळला असल्यानेच जनता समाधानी असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या मागणीनुसार विकासकामांची पुर्तता करणारे नगरसेवकच खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधी असतात.

अमृत, भुमीगत गटार योजना, उद्यान आदींसह केंद्रातील विविध योजनांचा लाभ शहरातील जनतेस कसा मिळेल या दृष्टीकोनातून आपला व नगरसेवकांचा पाठपुरावा राहिला आहे. केंद्रातील योजनांचे श्रेय स्थानिक लोकप्रतिनिधी उचलत असले तरी जनतेला विकासकामे कुणामुळे होत आहे ते समजते. करोनासारख्या संकट काळात देखील भाजप नगरसेवक करोना (corona) बाधीत होत असले तरी न डगमगता मदतीसाठी तत्पर असल्याचे चित्र जनतेने पाहिले आहे.

प्रलंबित विकासकामांच्या पुर्तीसाठी जनतेने भाजपच्या पाठीशीच उभे राहावे, असे आवाहन खा.डॉ. भामरे यांनी शेवटी बोलतांना केले. गत पंचवीस वर्षात झाली नाही इतकी विकासकामे भाजप नगरसेवकांनी या पाच वर्षात करून दाखवली आहे. प्रभाग 9 मध्ये कोट्यवधीची विकासकामे साकारणारे दिनेश साबणेसह नगरसेवक जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहे.

भाजपतर्फे चेहरे पाहून नाही तर काम पाहून उमेदवारी दिली जात असल्यानेच विकासकामांची पुर्तता होवू शकल्याचे गटनेते सुनिल गायकवाड यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट करत भाजप नगरसेवकांतर्फे झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश पठाडे यांनी केले. कार्यक्रमास राजेंद्र शेलार, प्रकाश सुराणा,

सोमा गवळी, राकेश शिंदे, श्रीकांत शेवाळे, युवा गीते, रवी हिरे, महेश लोंढे, निसार शेख, महेश वाघ, दुर्गा कोते, पिंटू गायकवाड, मुकेश गवळी, चेतन अहिरे, शरद पानपाटील, किशोर गुप्ता, पंकज बिरारी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार दिनेश साबणे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com