भाजपची जन आशीर्वाद यात्रा उद्या नाशकात; असा असेल प्रवास

भाजपची जन आशीर्वाद यात्रा उद्या नाशकात; असा असेल प्रवास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) या जन आशीर्वाद यात्रेच्या (Jan Ashirwad Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. आजपासून राज्याच्या वेगवेगळया भागात ही जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे....

उद्या (दि.१७) ही यात्रा नाशिक जिल्हयातून (Nashik district) जाणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नाशिक जिल्हा भाजप ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर (Keda Aher) यांनी दिली. भाजप नाशिक मुख्यालय वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve), नाशिक जिल्हा ग्रामीणचे संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव (Sunil Bachhav), नाशिक ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव (Dada Jadhav), नाशिक जिल्हा ग्रामीण सरचिटणीस नंदू खैरनार (Nandu Khairnar), ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ (Shankarrao Wagh) आदी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जनआशिर्वाद यात्रा पालघर (Palghar), नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. आज पालघर येथून प्रारंभ झाला आहे.

उद्या सकाळी ९ वाजता यात्रेची सुरवात दहावा मैल नाशिक येथून होणार आहे. सकाळी ९.४० ला ओझर येथे शेतकऱ्यांशी सवांद, १०.१० वाजता पिंपळगाव येथे द्राक्ष उत्पादक शेतकाऱ्यांशी सवांद, ११ वाजता शिरवाडे फाटा, ११.३० वाजता वडाळी भोई, ११.४५ वाजता मंगरूळ फाटा येथे शेतकऱ्यांशी सवांद, दुपारी १.३० वाजता चांदवड येथे स्वागत, दुपारी २ वाजता पत्रकार परिषद, २.३० वाजता चांदवड येथे कोविड सेंटरला भेट, २.४५ ला लसीकरण केंद्रास त्या भेट देणार आहे.

दुपारी ४ वाजता उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापाऱ्यांशी संवाद, ४.३० वाजता सौंदाणे येथे संवाद, ५ वाजता टेहरे येथे संवाद, ५.१५ ला मालेगाव चौफुली मालेगाव भाजप अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून यात्रेचे स्वागत, ५.४५ वाजता मोसम पूल येथे उपस्थितांशी सवांद, ६ वाजता सटाणा नाका येथे स्वागत सभा.

दि. १८ ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता मालेगावहून नामपूरकडे प्रयाण, सकाळी ९.३० ला नामपूर येथे आगमन, १० वाजता ताहाराबाद, ११ वाजता शेलबारी, १२ वाजता पिंपळनेर, पिंपळनेर येथे धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील व पदाधिकाऱ्यांच्या वतीने धुळे जिल्ह्यात यात्रेचे स्वागत. यानंतर नंदुरबार जिल्ह्यात यात्रा फिरून दि. २ ऑगस्टला धुळे येथे सायंकाळी ६ वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी सवांद होऊन येथे यात्रेचा समारोप होईल.

ही यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते आ. जयकुमार रावल, खा. डॉ. हिना गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. डॉ. विजयकुमार गावित, आ. डॉ. राहुल अहिरे, आ. दिलीप बोरसे, आ. कांशीराम पावरा, आ. राजेंद्र पाडवी, आ. अमरीश पटेल, एन. डी. गावित, प्रकाश गेडाम यांचा जनआशीर्वाद यात्रेस विशेष सहभाग असणार आहे, असेही केदा आहेर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com