भाजपचा जनसंपर्कावर भर

भाजपचा जनसंपर्कावर भर

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

नाशिक मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Nashik NMC Upcoming Elections नाशिक महानगर भाजपचा BJP विभागनिहाय निवडणूक समन्वय समित्यांच्या बैठकी व जनसंपर्क अभियान राबवून वन बूथ थर्टी युथद्वारे प्रत्येक मतदाराच्या मनात घर करण्याचा सपाटा लावला आहे. विरोधक कितीही आणि कशीही टीका करत राहो, आपण आपला राजमार्ग सोडायचा नाही, असा निर्धार केला आहे.

माजी पर्यटनमंत्री व प्रदेश उपाध्यक्ष आ. जयकुमार रावल व नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी विभाग निहाय समित्या निर्माण केल्यामुळे प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष या सर्वानाच स्थान मिळाले आहे.

निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या सर्वच पदाधिकार्‍यांना स्थान मिळाल्यामुळे नाशिक महानगरातील आमदार, शहर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये विश्वासाचे वातवरण तयार झाले आहे. महापालिकेत 100 प्लस नगरसेवक निवडून यावेत, महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता यावी. म्हणून प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विभागनिहाय समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

वेळोवेळी ते समित्यांचा कामाचा आढावा घेऊन भाजप शहर अध्यक्ष व प्रदेश प्रदेश पदाधिकारी यांना कळविण्यात येत आहे. त्यानुसार आढावा बैठका घेऊन पुढील कामकाजाचे नियोजन होत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये मंडल अध्यक्ष सर्वात महत्वाचा दुवा असल्याने रोज होणार्या मंडलातील कार्यक्रमाचा आढावा समिती समन्वयक या नात्याने सादर करत आहे.

संबंधित अहवाल महानगराच्या कोर कमिटीकडे पाठवला जात आहे, त्यानुसार कार्यवाही होऊन विभागीय समित्यांचा कार्याची वेळोवेळी दिशा ठरविण्यात येत आहे. विशेष करून बुथ रचना, स्थानिक नागरिकांशी सुसंवाद त्यातून आगामी निवडणुक संदर्भात मते जाणून घेणे त्यातून पुढील कार्याची दिशा ठरविणे, नागरसेवकांशी सु संवाद , पक्षाच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे.

गत निवडणुुकीत जी चूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घडली. खूप चांंगली कामे करुनही ती त्यांना मतदारांना सांगता आली नाही. त्याचा प्रचार, प्रसार करता आला नाही. ती घोडचूक आता पुन्हा आपल्याकडून होणार नाही याची पुरेपूर दक्षता भाजपने घेतला आहे. शहर बससेवा मोठा गाजावाजा करुन सुरु केली. तिला पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर आता विशेष महासभा बोलावून मानधनावर का होईना नोकरभरतीचा मार्ग माकळा केला. तसेच आयटी पार्कला मंजुरी मिळवली.

नमामी गोदासाठी अठराशे कोटींचा निधी मंजूर करुन आता ते हे प्रकल्पाचे काम धूमधडाक्यात कसे सुरु होईल, त्यासाठी केंद्रातील बलाढ्य नेते मंडळी नाशिकमध्ये येऊन कसा गाजावजा करतील, याचेे नियोजन केले जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात सर्वत्र भाजपचा बोलबाला वाजल्याशिवाय राहणार नाही. अशी वातावरण निर्मिती करण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे.

मंंडल अध्यक्षांंच्या मार्गदर्शनाखील बूथ प्रमुखांना प्रत्येक मतदारापर्यंंत पोचवण्याची व्यवस्था केली जात आहे. संक्रातींच्या तिळगुुळाच्या गोड वातावरणाचा पुरेपूर वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जाणार आहे. मनपाचा हा किल्ला सर करण्याासठी दिनकरराव आढाव, संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, सतिष कुलकर्णी, प्रताप मेहरोलिया, हेमंत गायकवाड, बाळासाहेब सानप, गणेश गिते, उध्दव निमसे, अरूण पवार, रंजना भानसी, कमलेश बोडके, जगदीश पाटील, ज्ञानेश्वर काकड, चंद्रशेखर पंचाक्षरी,

सातपूर विभागात समिती सदस्य महेश हिरे, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे भगवान काकड, महेश हिरे, गोविंद घुगे, मुकेश शहाणे, प्रतिभा पाटील समन्वयक अविनाश पाटील, शिवाजी बरके, विजय साने, सतीश सोनवणे, चंद्रकांत थोरात, संध्या कुलकर्णी, अनिल ताजनपुरे , सुनील देसाई, भास्कर घोडेकर, लक्ष्मण सावजी, भिकुबाई बागुल, शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, स्वाती भामरे देवदत्त जोशी यांचे उपस्थितीत बैठकांचा धुमधडाका चालू आहे. बैठकांच्या रचना व त्या साठी लागणारी वेळोवेळी मदत त्यासाठी लागणारी साधनसामग्री यासाठी शहर संघटनमंत्री प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगूरकर, जगन पाटील, सुनील केदार आदी दिग्गजांची टीम सज्ज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com