भाजपचे ‘एकला चलो रे’ यशस्वी होणार?

भाजपचे ‘एकला चलो रे’ यशस्वी होणार?

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

नाशिकचे (Nashik) भारतीय जनता (Bhartiya Janata Party) पक्षाचे शिलेदार आगामी काळात कशा राजकीय हालचाली करतात. विरोधकांचे वार कसे परतवतात. यावर नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) उमललेले सत्ता कमळ सदाबहार राहणार की मावळणार? हे ठरणार आहे. आज पर्यंत शिवसेनेच्या (Shiv Sena) साथीने वाटचाल करणाऱा भाजपा मनसेचा टेकून घेतो का? एकला चलोरे नारा म्हणायला सोपा असला तरी प्रत्यक्षात शक्य आहे का याचाही विचार करुन मंथन करावे लागणार आहे.

साडे चार वर्षापूर्वी तत्त्कालीन मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Denvendra Fadnavis) यांनी नाशिक दत्तक घेत असल्यााची घोषणा करुन आश्वासनांची खैरात केली. नाशिककरांच्या नसानसात विकासाची हवा भरली. अच्छे दिनाच्या घोषणे प्रमाणे नाशिककरांनी कमळाला भरभरुन मते दिली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे एकहाती सत्तेचे स्वप्न साकार झाले. महापालिकेत कमळ फुलल्या नंतर नाशिककरांच्या आशा खूपच पल्लवित झाल्या.

केंद्र आणि राज्यातील निर्विवाद सत्ता, स्थानिक तीनही आमदार पक्षाचे आणि महापालिकाही स्वबळावर सत्तेत म्हटल्यावर नाशिक आता स्मर्ट व्हायला वेळ लागणार नाही. असे वाटत होते. प्रत्यक्षात नाशिककरांना स्मार्ट रोड (Smart road) व सिटी लिंक बसेसे (City Link Buses), व स्मार्ट सिटी (Smart City)च्या घोषणा आता पर्यंत दिसल्या. बाकी जनता पहातच आहे.

ज्यावळी सत्ता हाती आली तेव्हा नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे होती. पालकमंत्र्यांची मर्जी केवळ बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांच्यावर होती. आमदारकीसह शहराध्यक्षपद त्यांच्याकडे होते. महाजनांच्या एकछत्री कारभाराला रान मोकळे होते. महापालिका निवडणूकीत (Municipal elections) तिकीट वाटप करताना भाजपला (BJP) केवळ सत्तेचे स्नवप्न साकार करायचे होते. त्यामुळे केवळ निवडून येण्याची क्षमता एढेच पाहिले जात होते.

काहीही करुन सत्तेत जायचेच,या ध्येयाने पछाडलेले विविध पक्षातुन आलेले उमेदवार भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. साडेचार वर्षात त्यातील काही पुन्हा आपल्या स्वगृही गेले. कारण ज्या मोठ्या अपेक्षेने ते भाजपकडे आले होते, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. स्वाभाविकपणे नाशिककरांच्या हितापेक्षा स्वहित प्रबळ, निर्णायक ठरले. नंतर सानपांच्या विधानसभा निवडणूक तिकिटावर गदा आली. ते काही काळ पक्ष सोडून गेले. पुन्हा पक्षात आले. माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी सोडचिठ्ठी देऊन पुन्हा आपल्या मूळ पक्ष शिवसेनेते गेले. त्यांचे पुत्र माजी उपमहापौर प्रथमेश गितेंनीही (Former Deputy Mayor Prathamesh Giten) भाजप सोडला.

तसेच सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी ही रामराम ठोकला. त्यांच्या मातोश्री उपमहापौर भिकुबाई बागुल अद्याप पक्षात आहेत. पक्षासाठी रक्त जाळलेले, खस्ता खाल्लेेले, सतरंज्या उचलणारे, आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आयुष्य खर्ची घातलेले फक्त निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनच वावरत आहे. त्यांच्या पयर्ंंत सत्ता पोचलीच नाही. ही त्यांची खंदखद आहे. नवगतांची वज्रमूठ पक्ष आणि होणार्‍या प्रत्येक निर्णयाभोवती आवळली जात आहे. अशा तक्रारीं वाढल्याने गिरीश महाजन पर्वाचा अस्त होऊन नाशिकची सूत्रे जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्याकडे आली.

आता सारे काही सुरळीत होईल या भावनेने पदाधिकारी सुखावले. असले तरीे असंतुष्टांच्या कारस्थानांमुळे आजही अंतर्गत असंतोष आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कांँग्रेस (Rashtravadi Congres), काँग्रेस (Congres), डावे व मनसे, आआप यांंनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar), माजी मंत्री जयकुमार रावळ,

शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, विजय साने, लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, महेश हिेरे, बाळासाहेब सानप, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समीती सभापती गणेश गिते. कमलेश बोडके, जगदीश पाटील, सुनील केदार, हिमगौरी आडके, उत्तम उगले,गणेश कांबळे आदींच्या खांद्यावर पुढील सत्ता टिकवण्याची मोठी जबाबदारी आहे.

ते येत्या काळात जुन्या नव्यांंचा संगम कसा घालतात. नाशिकचा विकास कोठे आणि कसा केला हे कसे नाशिककरांंना पटवून देतात व पुढील राजकीय खेळी कशी खेळतात. यावर भारतीय जनता पक्षाचे भवितव्य अवलंंबून आहे. त्यामुळे एकला चलोरे नारा म्हणायला सोपा असला तरी प्रत्यक्षात शक्य आहे का याचाही विचार करावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com