भाजपाचे शेतीपूरक उद्योग धोरण: बावनकुळे

भाजपाचे शेतीपूरक उद्योग धोरण: बावनकुळे

निफाड । प्रतिनिधी | Niphad

प्रत्येक समाजातील बेरोजगार (unemployed) घटकांपर्यंत रोजगार (Employment) पोहचविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान रोजगार योजना (Pradhan Mantri Rojgar Yojana) सुरू असून, त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.

शेतीपूरक व्यवसाय (Agricultural ancillary business) आणि उद्योगांना मदत करणे भाजपचा (BJP) उद्देश असल्याचे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Maharashtra state president of BJP Chandrakant Bawankule) यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बेरोजगारांना कर्जवाटप सोहळ्यात (loan distribution ceremony) ते बोलत होते.

ना. बावनकुळे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी प्रत्येक युवकाला रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध बँकांच्या माध्यमातून युवकांना कर्जवाटप करण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे.

करोना (corona) काळात 150 देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसींचा (vaccination) पुरवठा करून करोनापासून हजारो, लाखो जनतेचे प्राण वाचविण्याचे श्रेय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या. कर्जमाफी, अनुदान देऊन शेतकर्‍यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या घटकांपर्यंत रोजगार पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे. त्या दिशेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निफाड तालुक्यात (niphad taluka) मुख्यमंत्री सहाय्यता रोजगार योजनेतून (Chief Minister's Assistance Employment Scheme) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी रोजगार उपलब्ध करून दिले. त्यामध्ये 35 टक्के अनुदानाच्या माध्यमातून 75 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितले. त्यांच्या हस्ते चंद्रकांत बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आमदार देवयानी फरांदे, भागवत बाबा बोरस्ते, भाजपचे पिंपळगाव शहरप्रमुख गोविंद कुशारे, दादा जाधव, संदिप पाटील, संजय जोशी, अविनाश गायकर, महासचिव विजय चौधरी, निवृत्ती शिरसाठ आदींसह निफाड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com