
सिन्नर । वार्ताहर Sinnar
मुख्याधिकार्यांनी महिनाभरात शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे (Road repairs) आश्वासन देऊनही रस्ते दुरूस्त न झाल्याने तालुका भाजपच्या (bjp) वतीने शुक्रवारी (दि.10) सकाळी 11 वा. शहरात ठिय्या आंदोलन (agitation) करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे (balasaheb hande) यांनी दिली. याबाबत तहसीलदारांना निवेदन (memorandam) देण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरापासून नगरपरिषद हद्दीतील अनेक रस्त्यांची दुरवस्था (Poor condition of roads) झाली आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे(pothholls) पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही. खड्ड्यांमुळे शहरामध्ये वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेकांचे हात व पाय अधू झाले असून अनेक नागरिकांना मणक्याचा त्रास सुरू झाला आहे. नवरात्रीमध्ये मुख्याधिकार्यांनी एक महिन्यामध्ये सर्व रस्ते दुरूस्त करण्याचे आश्वासन भाजप पदाधिकार्यांना दिले होते.
मात्र अजूनही त्यांनी ते आश्वासन पाळले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे भाजपकडून शहरातील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत मुख्याधिकारी रस्ते दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष हांडे, महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे, ज्येष्ठ नेते जयंत आव्हाड, शहराध्यक्ष सचिन गोळेसर, दीपाली लोणारे, भाऊसाहेब शिंदे यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व मुख्याधिकारी संजय केदार यांना देण्यात आल्या आहेत.